JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विजयाचा मंत्र! टीम इंडियाला करावं लागेल हे छोटसं काम

विजयाचा मंत्र! टीम इंडियाला करावं लागेल हे छोटसं काम

टीम इंडियाला (Team India) गेल्या काही काळापासून मोठ्या स्पर्धांच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. काहीच दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून: टीम इंडियाला (Team India) गेल्या काही काळापासून मोठ्या स्पर्धांच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. काहीच दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. 2013 नंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकता आलेली नाही. वेस्ट इंडिजचे महान फास्ट बॉलर कर्टली एम्ब्रोस (Curtly Ambrose) यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे, तसंच विराट कोहलीच्या टीमला मोलाचा सल्लाही दिला आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये 3 फायनल आणि 3 सेमी फानलमध्ये पराभव पत्करावा लागला. कर्टली-करिश्मा शोमध्ये एम्ब्रोस यांनी टीम इंडियाच्या या कामगिरीवर आपलं मत मांडलं. ‘मागच्या 6-7 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाचा सेमी फायनल आणि फायनलमध्ये पराभव झाला. मला याबाबत चिंता आहे, कारण याकाळात त्यांनी चांगली कामगिरी केली होती,’ असं एम्ब्रोस म्हणाले. ‘मोठी संधी असताना चांगलं खेळावं लागतं, पण टीम इंडिया तेव्हाच अपयशी ठरते. फायनल आणि सेमी फायनलमध्ये येऊन टीम त्यांची रणनिती बदलते आणि खेळाडू स्वत:वर जास्त दबाव घेतात. टीम इंडियाच्या पराभवाचं हेच कारण असेल, तर ते चुकीचं आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर जे करत आलात तेच करा आणि आपल्यातल्या चुका सुधारा. तुम्ही रणनिती आणि खेळायची पद्धत बदलू शकत नाही. मग ती सेमी फायनल असो किंवा फायनल. तुम्ही तेच करा जे सुरुवातीपासून करत आला आहात, यामुळे तुम्हाला यश मिळेल,’ असा गुरूमंत्र कर्टली एम्ब्रोस यांनी दिला. विराट कोहलीने (Virat Kohli) भारतासाठी 201 मॅचमध्ये टीमचं नेतृत्व केलं आहे, पण त्याला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. विराट कर्णधार असताना भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव झाला. त्याआधी धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या