JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Salman Khan: 'हा' क्रिकेटर आहे सलमान खानचा 'फेव्हरेट', लवकरच IPL मध्ये 'भाईजान'चीही एन्ट्री

Salman Khan: 'हा' क्रिकेटर आहे सलमान खानचा 'फेव्हरेट', लवकरच IPL मध्ये 'भाईजान'चीही एन्ट्री

येत्या ईदच्या मुहूर्तावर सलमानचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं सलमान चक्क आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे.

जाहिरात

Salman Khan: 'हा' क्रिकेटर आहे सलमान खानचा 'फेव्हरेट', लवकरच IPL मध्ये 'भाईजान'चीही एन्ट्री

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल: सध्या क्रिकेटरसिकांमध्ये आयपीएलची फार मोठी क्रेझ आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्ण प्रेक्षकक्षमतेसह सामने होत असल्यानं स्टेडियम्स हाऊसफुल्ल होतायत. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ क्रिकेटप्रेमी एन्जॉय करत आहेत. आता याच आयपीएलची क्रेझ अगदी बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. सलमान खानची होणार आयपीएलमध्ये एन्ट्री बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खानलाही क्रिकेटचं वेड आहे. याचदरम्यान येत्या ईदच्या मुहूर्तावर सलमानचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं सलमान चक्क आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. येत्या विकेंडला मॅचदरम्यान कदाचित सलमानची क्रिकेट कॉमेंट्रीही ऐकायला मिळेल अशी आशा आहे. स्टार स्पोर्ट्सच्या मॅचदरम्यानच्या शोमध्ये येत्या शनिवार-रविवारी एन्ट्री होणार आहे.

संबंधित बातम्या

सलमानला आवडतो ‘धोनी’ सलमान खानच्या आयपीएल एन्ट्रीचा एक टीझर नुकताच स्टार स्पोर्ट्सनं प्रसिद्ध केलाय. त्यात सलमान भाई लहान लहान क्रिकेट फॅन्ससह धमाल करताना दिसत आहे.

स्टार स्पोर्टसच्या व्हिडीओमध्ये सलमाननं आयपीएलसंदर्भात या छोट्या क्रिकेट फॅन्सना काही प्रश्नही विचारले आहेत. यादरम्यान सल्लूभाईनं त्याचा आवडता खेळाडू हा दुसरा तिसरा कोणी नसून चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी असल्याचं सांगितलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या