JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : टीम इंडियाच्या कॅप्टनचा शेवटचा वर्ल्ड कप, स्पर्धेपूर्वी सांगितली मोठी गोष्ट

Women's World Cup : टीम इंडियाच्या कॅप्टनचा शेवटचा वर्ल्ड कप, स्पर्धेपूर्वी सांगितली मोठी गोष्ट

न्यूझीलंडमध्ये 4 मार्चपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा (Women’s World Cup 2022) सुरू होत आहे. टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजचा (Mithali Raj) हा शेवटचा वर्ल्ड कप आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च : न्यूझीलंडमध्ये 4 मार्चपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा (Women’s World Cup 2022) सुरू होत आहे. टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजचा (Mithali Raj) हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. मिताली सर्वात प्रथम 2000 साली न्यूझीलंडमधील झालेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. गेल्या 22 वर्षांमध्ये क्रिकेटमधील अनेक रेकॉर्डची नोंद करणाऱ्या मितालीला वर्ल्ड कप चॅम्पियनशिपनं अद्याप हुलकावणी दिलेली आहे. 2017 साली भारतीय टीम फायनलमध्ये पराभूत झाली होती. मितालीचा एक व्हिडीओ आयीसीनं (ICC) पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने आजवरच्या कारकिर्दीमधील अपुरी इच्छा सांगितली आहे. ‘मी वर्ल्ड कप 2000 पासून आजवरचा मोठा प्रवास पूर्ण केला आहे. तो वर्ल्ड कप देखील न्यूझीलंडमध्ये झाला होता. टायफॉयड झाल्यानं मला त्या वर्ल्ड कपमध्ये पूर्ण खेळता आले नाही. आता मी पुन्हा एकदा इथे आली आहे. या मोठ्या प्रवासाचा सुखद शेवट व्हावा अशी माझी इच्छा आहे. आमचे सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करावी. भारताला ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यास मदत करावी, अशी माझी इच्छा आहे.’ वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी झालेल्या वन-डे सीरिजमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 4-1 असा पराभव केला. या पराभवानंतरही 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय टीम सज्ज असल्याचं मितालीनं सांगितल. ‘वर्ल्ड कपूर्वी आम्हाला काही गोष्टींंमध्ये सुधारणा करण्याची गरज होती. आम्ही मागील सीरिजमध्ये तसंच त्यापूर्वी झालेल्या मॅचमध्येही त्यावर फोकस केला होता. आता भारतीय टीम सातत्यानं 250 रन करत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही आम्ही हे कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.’ असे मितालीने स्पष्ट केले. IPL 2022 : सुरेश रैनाची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री! जाणून घ्या Viral Photo मागील सत्य यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 8 टीम खेळणार आहेत. भारताची पहिली लढत पाकिस्तान विरूद्ध (India vs Pakistan) 6 मार्च रोजी आहे. या स्पर्धेचा हा 12 वा सिझन आहे. ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक 6 वेळा महिला वर्ल्ड कप जिंकला आहे. इंग्लंडनं 4 वेळा तर न्यूझीलंडनं 1 वेळा वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. इंग्लंडची टीम या स्पर्धेची गतविजेती आहे. टीम इंडियाच्या वन-डे टीमची कॅप्टन असलेल्या मिताली राजनं टी20 टीममधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या