JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / श्रीलंकेनंतर आणखी एका टीममध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रॅक्टिस स्थगित

श्रीलंकेनंतर आणखी एका टीममध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रॅक्टिस स्थगित

क्रिकेट विश्वाला कोरोनाचा (coronavirus) फटका बसण्याचे प्रमाण अजूनही सुरुच आहे. कोरोनामुळेच आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे : क्रिकेट विश्वाला कोरोनाचा (coronavirus) फटका बसण्याचे प्रमाण अजूनही सुरुच आहे. कोरोनामुळेच आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली. आता वेस्ट इंडिजच्या (West Indies) टीममध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर मार्क्विनो मिंडले (Marquino Mindley)  याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजलाला टीमचे सराव शिबिर स्थगित करावे लागले आहे. मिंडले दुसऱ्या टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आल्याची माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजने दिली आहे. वेस्ट इंडिजचे सराव शिबिर सेंट लुसियामध्ये 21 मे पासून सुरू झाले आहे. यामधील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट घेतली होती. त्यामध्ये जमेकाचा फास्ट बॉलर मिंडले दुसऱ्या टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आढळला. त्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. आता पुढील दोन टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्याला आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द, कोरोना आणि व्यग्र वेळापत्रकामुळे निर्णय मिंडलेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने टीममधील अन्य सर्व सदस्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली, त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. वेस्ट इंडिज टीम 10 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्टची मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) भाग असून इंडिजमध्ये होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या