JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियासाठी द्रविड-लक्ष्मण एकत्र, गांगुलीनं पुन्हा जमवली Very Very Special जोडी

टीम इंडियासाठी द्रविड-लक्ष्मण एकत्र, गांगुलीनं पुन्हा जमवली Very Very Special जोडी

राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) ही Very Very Special जोडी टीम इंडियासाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 नोव्हेंबर:  राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) या दोघांनी क्रिकेट खेळत असताना नेहमीच टीम इंडियाचे संकटमोचक म्हणून जबाबदारी बजावली आहे. या दोघांनी स्वतंत्र आणि एकत्र येऊन टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली झालेल्या कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाला फॉलो ऑन मिळाल्यानंतर या दोघांनी केलेली ऐतिहासिक पार्टनरशिप कोणताही क्रिकेट फॅन विसरू शकणार नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो एक सोनेरी अध्याय आहे. द्रविड आणि लक्ष्मण ही जोडी पुन्हा एकदा टीम इंडियासाठी एकत्र आली आहे. रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) उत्तराधिकारी म्हणून राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचवेळी द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक होण्यास लक्ष्मणनं होकार दिल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ANI शी बोलताना दिली आहे. द्रविडनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक व्हावं आणि लक्ष्मणनं NCA मध्ये त्याची जागा घ्यावी यासाठी गांगुली आग्रही होते. गांगुलींचे हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात उत्तम समन्वय आहे. हेच समन्वय टीम इंडिया आणि NCA मध्ये असावं असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे लक्ष्मणनं ही जबाबदारी स्वीकारावी असा गांगुलींचा आग्रह होता. लक्ष्मण सध्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) या टीमचा मेंटॉर आहे. NCA अध्यक्ष झाल्यावर त्याला हे पद सोडावे लागेल. राहुल द्रविड लागला कामाला, पहिल्याच दिवशी केलेली कृती वाचून वाटेल अभिमान लक्ष्मण कौटुंबिक कारणांमुळे बंगळुरूमध्ये शिफ्ट होण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यानं या पदासाठी बीसीसीआयला नकार दिला होता. पण आता तो अखेर तयार झाला आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता लवकरच नियमानुसार NCA प्रमुख पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर NCA च्या बॉलिंग प्रशिक्षक पदासाठी देखील अर्ज मागवण्यात येणार आहेत. NCA चे विद्यमान बॉलिंग कोच पारस म्हांब्रे आता टीम इंडियीाचे बॉलिंग कोच झाल्यानं हे पद देखील रिक्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या