JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोहलीचं Live सुरू असतानाच अनुष्कानं विचारला प्रश्न, विराटपेक्षा अभिनेत्रीचीच रंगली चर्चा

कोहलीचं Live सुरू असतानाच अनुष्कानं विचारला प्रश्न, विराटपेक्षा अभिनेत्रीचीच रंगली चर्चा

विराट कोहलीनं (Virat Kohli) इन्स्टाग्रामवर क्रिकेट फॅन्सच्या प्रश्नांना Live उत्तरं दिली. विराटचं हे सत्र सुरू असताना त्यामध्ये अचानक अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) प्रवेश केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात सर्वप्रथम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आहे.  त्यानंतर इंग्लंड विरुद्धची पाच टेस्टची सीरिज टीम इंडिया खेळणार आहे. या मोठ्या दौऱ्याच्या तयारीमध्ये असताना विराटनं फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन ठेवलं होतं. विराटने यावेळी क्रिकेट फॅन्सच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. विराटचं हे सेशन रंगलं असताना त्यामध्ये अचानक अनुष्का शर्माची (Anushka Sharma) एन्ट्री झााली. अनुष्काने देखील विराटला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न क्रिकेटशी संबंधित नव्हता. अनुष्कानं विराटला विचारले की, ‘माझा हेडफोन कुठे आहे?’ अनुष्काला हेडफोन मिळत नव्हते. त्यामुळे तिने विराटचं सेशन सुरु असतानाच त्याला हा प्रश्न विचारला. त्यावर विराटने ‘बेडच्या जवळच्या टेबलवर आहे, लव्ह’ असे उत्तर दिले. विराटच्या  या सेशनपेक्षा अनुष्काच्या त्यामधील अचानक एन्ट्रीचीच जास्त चर्चा रंगली आहे. विराट कोहलीला फॅन्सनी प्रश्न विचारला की, ‘वामिका या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? मी तिचा फोटो पाहू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना विराटनं सर्वप्रथम वामिका या नावाचा अर्थ समाजवून सांगितला. वामिका हे दूर्गा देवीचं नाव असल्याचं विराटने सांगितलं. त्यानंतर तिच्या फोटो बद्दलच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले. ‘ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही’, रविंद्र जडेजानं सांगितला भीतीदायक अनुभव " तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे." असे विराटने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या