JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'आता माझी सटकली..' विराट-रोहित मधील संबंधांवर सचिनच्या खास मित्राचं मोठं वक्तव्य

'आता माझी सटकली..' विराट-रोहित मधील संबंधांवर सचिनच्या खास मित्राचं मोठं वक्तव्य

Team India: भारतीय क्रिकेट टीममध्ये सध्या बदल होत आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनपदाचा कालखंड आता संपला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेट टीममध्ये (Team India) सध्या बदल होत आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनपदाचा कालखंड आता संपला आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) वन-डे आणि टी20 टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली आहे. तो आता लवकरच टेस्ट टीमचा कॅप्टन होऊ शकतो. भारतीय टीममधील या बदलाबाबत माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याने गंभीर वक्तव्य केले आहे. 1990 च्या दशकातील स्टार आणि सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) जवळचा मित्र असलेल्या कांबळीनं ‘कू’ या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘आता माझी सटकली… अहंकाराची ही लढाई भारतीय क्रिकेटसाठी चांगली नाही. विराट आणि रोहित दोघंही भारतीय टीमसाठी महत्त्वाचे आहेत. सध्या जे सुरू आहे ते चांगलं नाही.’ अशी पोस्ट कांबळीनं लिहिली असून त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय टीमला टॅग केले आहे. विराट कोहलीनं टी20 टीमचे नेतृत्त्व स्वत:हून सोडले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या दौऱ्यापूर्वी त्याला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टेस्ट सीरिजमधील पराभवानंतर विराट कोहलीनं टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. ‘टीम इंडियाचा बेस्ट खेळाडू ठरला राजकारणाचा बळी’, माजी क्रिकेटपटूचा आरोप विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या बातम्या यापूर्वी देखील माध्यमांमध्ये आल्या आहेत. विराटनं कॅप्टन म्हणून केलेल्या काही सार्वजनिक वक्तव्यामुळे याबाबत संकेत मिळत होते. मात्र टी20 वर्ल्ड कपसह अनेक वेळा रोहित शर्मा फेल गेल्यानंतर विराटनं त्याचा बचाव देखील केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या