मुंबई, 1 जानेवारी : संपूर्ण जगात नव्या उत्साहात आणि उमेदीनं नववर्षाचं स्वागत (New Year 2022) होत आहे. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसनं (Coronavirus) सर्वांना वेठीस धरलं आहे. कोरोना महामारीनंतर जगण्याची पद्धतच बदलली आहे. क्रीडा विश्वालाही त्याचा फटका बसलाय. अनेक स्पर्धा यामुळे रद्द कराव्या लागल्या. क्रिकेट विश्व देखील याला अपवाद नाही. गेल्या आयपीएल स्पर्धा (IPL 2021) कोरोनाच्या उद्रेकामुळे दोन टप्प्यात घ्यावी लागली. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवी टेस्ट देखील होऊ शकली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला देखील याचा जोरदार फटका बसला आहे. या सर्व अडचणींवर मात करत रोज वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेटचे सामने होत आहेत. त्यात अनेक विक्रम केले जात आहेत. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेत (India tour of South Africa) आहेत. भारतीय टीमनं हॉटेलमध्ये एकत्र नव्या वर्षाचे स्वागत केले. हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli) सर्व जण यामध्ये सहभागी झाले होते. विराटनं या सेलिब्रेशनचे तीन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये विराट, द्रविडसह आफ्रिका दौऱ्यावरील संपूर्ण टीम इंडिया आहे. दुसऱ्या फोटोत विराटसह इशांत शर्मा, अजिंक्य राहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि अन्य प्रमुख खेळाडू आहेत. तर तिसरा फोटो विराट आणि अनुष्काचा (Anushka Sharma) आहे. विराटनं यावेळी सर्वांना नवे वर्ष आनंदाचे जावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
टीम इंडियानं बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) 113 रननं जिंकत 2021 चा शेवट जोरदार केला. या विजयामुळे तीन टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडियाकडे 1-0 अशी आघाडी आहे. टीम इंडियानं आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा सीरिज जिंकण्याची संधी भारतीय टीमला आहे. या सीरिजमधील दुसरी टेस्ट 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. IND vs SA : विराट कोहली आणि राहुल द्रविडनं ऐतिहासिक विजयानंतर केला डान्स, VIDEO VIRAL