मुंबई, 4 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under 19 World Cup 2022) दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅटर डेवाल्ड ब्रेविसची (Dewald Brevis) आयपीएल टीममध्ये दमदार एन्ट्री होणार हे स्पष्ट झाले आहे. ब्रेविसनं बांगलाेश विरूद्ध गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये दमदार शतक झळकावले. या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेनं सातव्या क्रमांकाच्या लढतीत बांगलादेशचा दोन विकेटनं पराभव केला. क्रिकेट विश्वात बेबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेविसचं या स्पर्धेतील हे दुसरं शतक आहे. त्यानं या वर्ल्ड कपमध्ये 6 मॅचमध्ये 84.33 च्या सरासरीनं सर्वाधिक 506 रन केले. यामध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रेविसनं या स्पर्धेतील 6 पैकी 5 इनिंगमध्ये 50 रनचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर तो एका अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. त्याचा हा धडाकेबाज खेळ आयपीएल ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटींग करत 293 रन केले होते. दक्षिण आफ्रिकेनं 294 रनचं आव्हान 48. 5 ओव्हरमध्येच पूर्ण केलेय सुपरलीग प्ले ऑफ सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं बांगलादेशचा तर श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यानंतर या दोन्ही टीममध्ये सातव्या क्रमांकासाठी सामना झाला. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर धवननं जोडले हात, Photo पाहून फॅन्स म्हणाले… संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेल्या ब्रेविसनं 130 बॉलमध्ये 138 रन काढले. या खेळीत त्यानं 11 फोर आणि 7 सिक्स लगावले. दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली होती. त्यावेळी ब्रेविसनं एक बाजू लावून धरली. मैदानात सेट झाल्यानंतर चौफेर फटकेबाजी करत टीमला विजयी मार्ग दाखवला.