JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup : 7 भारतीय खेळाडूंना नाकारली होती एन्ट्री, स्पर्धेनंतर झाला मोठा खुलासा

U19 World Cup : 7 भारतीय खेळाडूंना नाकारली होती एन्ट्री, स्पर्धेनंतर झाला मोठा खुलासा

टीम इंडियानं वेस्ट इंडिजमध्ये झालेला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 7 भारतीय खेळाडूंना विमानतळावरच अडवण्यात आले होते. त्यांना विमानतळावरूनच परत जाण्याचे आदेश देण्यात आले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : टीम इंडियानं वेस्ट इंडिजमध्ये झालेला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला. भारतीय टीमने फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव केला. या स्पर्धेत टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या स्पर्धेच्या दरम्यान 6 भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या स्पर्धेपूर्वी देखील 7 भारतीय खेळाडूंना वेस्ट इंडिज विमानतळावरच अडवण्यात आले होते. इतकंच नाही तर त्यांना परत भारतामध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. ‘पीटीआय’नं दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचे या स्पर्धेतील मॅनेजर लॉबजंग यांनी याबाबत खुलासा केला आहे. या वृत्तानुसार टीम इंडियातील सात सदस्यांना कोरोना व्हॅक्सिन न घेतल्यानं विमानतळावरच अडवण्यात आले होते. हे सर्व सदस्य तब्बल 24 तास विमातळावरच अडकले होते. अखेर या प्रकरणात सरकारनं हस्तक्षेप केल्यानं त्यांना वेस्ट इंडिजमध्ये प्रवेश देण्यात आला. भारतीय टीम दुबईहून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी वर्ल्ड कप विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा फास्ट बॉलर रवी कुमार, ओपनर अंगकृष रघूवंशी यांच्यासह 7 खेळाडूंना कोरोना व्हॅक्सिन न घेतल्यानं विमानतळावरूनच परत जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआय आणि आयसीसीशी चर्चेनंतर टीम मॅनेजमेंटनं या प्रकरणात मार्ग काढला. भारत आणि त्रिनिदाद सरकारलाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली. लॉबजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतामध्ये 15 ते 18 वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देणे अद्याप सुरू झालेले नाही, हे आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आम्हाला परत जाण्याचे आदेश दिले. आमची विमानतळावरील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. त्यावेळी एक विमान परत गेले. त्यानंतर पुढील विमान तीन दिवसांनी होते. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा कोच, मुंबईच्या दिग्गजची टीममध्ये एन्ट्री आम्ही वेस्ट इंडिजमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. विमानतळाच्या जवळील हॉटेलमध्ये आम्ही एक रात्र घालवली. आयसीसी आणि स्थानिक सरकारच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणावर तोडगा निघाला. टीम इंडियातील खेळाडूंसाठी तो भीतीदायक अनुभव होता.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या