मुंबई, 3 फेब्रुवारी: भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कपची (Under 19 World Cup 2022) फायनल होणार आहे. शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये या स्पर्धेचा विजेता ठरेल. भारताने बुधवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रोलियाचा 96 रननं पराभव केला. या विजयानंतर काही जबरदस्त योग जुळून आले आहेत. त्यामुळे यंदा भारतीय टीमचं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणार याचे संकेत मिळत आहेत. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये दिल्लीकर कॅप्टन टीम इंडियासाठी लकी ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि उन्मुक्त चंद (Unmukt Chand) या दिल्लीकरांच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील कॅप्टम यश ढूल (Yash Dhull) देखील दिल्लीकर आहे. हा योग इथेच थांबत नाही. विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर यश ढूल हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय कॅप्टन ठरला आहे. विराटनं 2008 साली ग्रुप स्टेजमध्ये शतक झळकावले होते. तर उन्मुक्तनं 2012 साली फायनलमध्ये शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता यशनं या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2 आऊट 37 असा स्कोर होता त्यावेळी यश मैदानात उतरला होता. तो खेळण्यासाठी आला त्यावेळी टीम इंडियावर दबाव होता. या दबावात यशनं भक्कम मानसिकतेनं खेळ करत शतक झळकावले. त्याने 110 बॉलमध्ये 110 रन काढले. यशच्या शतकामुळे टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 290 रन केले. VIDEO: शेवटच्या बॉलवर हवे होते 5 रन, फोर किंवा सिक्स न लगावता जिंकली मॅच! 291 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 41.5 ओव्हरमध्ये 194 रन ऑलआऊट झाली.भारताकडून विकी ओस्तवालनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी कुमार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 2 तर कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.