JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी हवे होते 6 रन, ट्रेंट बोल्टनं केलं असं काही...पाहा VIDEO

शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी हवे होते 6 रन, ट्रेंट बोल्टनं केलं असं काही...पाहा VIDEO

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ट्रेंट बोल्ट (Trent Boult) हा त्याच्या बॉलिंगसाठी जगभर ओळखला जातो. सुपर स्मॅश (Super Smash) स्पर्धेच्या लढतीमध्ये बोल्टनं बॅटनं केलेला खेळ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.

जाहिरात

Terrorist encounter security forces Jammu Kashmir Anantnag

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 डिसेंबर: न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ट्रेंट बोल्ट (Trent Boult) हा त्याच्या बॉलिंगसाठी जगभर ओळखला जातो. बोल्टने त्याचा वेग आणि स्विंग याच्या जोरावर अनेक दिग्गज बॅटर्सची झोप उडवली आहे. जगातील प्रमुख फास्ट बॉलरपैकी एक असलेला बोल्ट त्याच्या बॅटींगसाठी फारसा ओळखला जात नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर फक्त एक अर्धशतक आहे. बोल्टचा हा सर्व इतिहास माहिती असलेल्या फॅन्सना त्याने गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये जे केलं ते वाचून आश्चर्य वाटेल. न्यूझीलंडमध्ये सध्या सुपर स्मॅश (Super Smash) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बोल्टच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टस टीमला जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 6 रनची आवश्यकता होती. त्या बॉलवर बोल्ट स्ट्राईकला होता. त्यामुळे तो सिक्स मारेल अशी मोजक्याच मंडळींनी कल्पना केली असेल. बोल्टने त्या मोजक्या मंडळींचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने थेट सिक्स लगावत टीमला मॅच जिंकून दिली. विशेष म्हणजे या मॅचमधील शेवटच्या ओव्हरमध्ये नॉदर्न डिस्ट्रिक्टस टीमच्या 3 विकेट गेल्या होत्या. त्यानंतरी बोल्टनं जिद्द न सोडता टीमला मॅच जिंकून दिली. बोल्टने शेवटच्या बॉलवर लगावलेला सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

यापूर्वी कँटरबरी टीम 17.2 ओव्हर्समध्ये 107 रनवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे नॉर्दन सहज जिंकेल असा सर्वांचा अंदाज होता. पण, नॉदर्नला जिंकण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यांना अखेर शेवटच्या बॉलवर एक विकेटनं निसटता विजय मिळला. 2 बॉलमध्ये नाबाद 7 रन करणाऱ्या बोल्टनं 2 विकेट्स घेत टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ‘… म्हणून अश्विनला त्रास झाल्याचा मला आनंद’, रवी शास्त्रींचा अजब दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या