JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोहित शर्माने कॅप्टन होताच सांगितलं ICC स्पर्धेतील पराभवाचं समान कारण!

रोहित शर्माने कॅप्टन होताच सांगितलं ICC स्पर्धेतील पराभवाचं समान कारण!

आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवणे हे नवा कॅप्टन रोहित शर्मासमोरील (Rohit Sharma) प्रमुख आव्हान आहे. रोहितने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या आयसीसी स्पर्धांमधील पराभवाचं समान कारण सांगितलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर: टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या वन-डे सीरिजमध्ये रोहित त्याच्या कार्यकाळाची सुरूवात करणार आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करत टी20 टीमच्या कॅप्टनसीची सुरूवात केली होती. आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवणे हे नवा कॅप्टन रोहित शर्मासमोरील प्रमुख आव्हान आहे. रोहितने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या आयसीसी स्पर्धांमधील पराभवाचं समान कारण सांगितलं आहे. टीम इंडियाला सुरूवातीच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 मधील वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात अपयश आले. यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारतीय टीमचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आले होते. रोहितने ‘एक्ट्रा टाईम’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये या तीन्ही स्पर्धेतील पराभवातील समानता स्षष्ट केली आहे. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 साली झालेला वर्ल्ड कप आणि अगदी यंदाचा वर्ल्ड कप या तीन्ही स्पर्धेत आम्ही मॅचच्या पहिल्या टप्प्यात पराभूत झालो. या विषयाची मी खबरदारी घेणार आहे. आम्हाला अगदी खराब परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील सज्ज राहिले पाहिजे. 3 आऊट 10 या परिस्थितीमधूनही टीमला बाहेर पडता यायला हवे. 3 आऊट 10 असा स्कोअर असेल तर 180 किंवा 190 रन होणार नाहीत, असेही कुठेही लिहिलेलं नाही. टीमनं या पद्धतीनं तयारी करावी अशी माझी इच्छा आहे.’ असे रोहितने एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. विराटकडून कर्णधारपद काढून रोहितकडे का दिलं? गांगुलीनी सांगितलं कारण ‘समजा सेमी फायनलमध्ये 2 आऊट 10 अशी परिस्थिती असेल  तर तेव्हा आम्ही काय करणार? त्यामधून बाहेर पडण्याकडे आमच्याकडे काय प्लॅन आहे? मी त्या परिस्थितीचा विचार करत आगामी काळात या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.’ असे रोहितन यावेळी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या