JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडिया संकटात, 4 प्रमुख खेळाडू Out!

मोठी बातमी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडिया संकटात, 4 प्रमुख खेळाडू Out!

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs South Africa) टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. ही निवड होण्यापूर्वीच टीम इंडिया अडचणीत आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs South Africa)  टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबर रोजी तीन टेस्ट  मॅचमधील सीरिजची पहिली लढत सुरू होईल. भारतीय क्रिकेट टीमनं आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलण्याची संधी विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमकडे आहे. पण, या दौऱ्यासाठी खेळाडूंची घोषणा होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel), शुभमन गिल (Shubman Gill) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे चार प्रमुख खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यांना बरं होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्यांना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मुंबई टेस्टमध्ये खेळू शकले नव्हते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार जडेजाचा स्नायू दुखावला आहे. तर इशांतच्या बोटाला दुखापत झाली आहे. जडेजाची दखापत बरी होण्यास काही महिने लागू शकतात. त्याची सर्जरी झाली तर तो थेट आयपीएल 2022 च्या सुमारास फिट होईल. जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये अक्षर पटेलनं मुंबई टेस्टमध्ये बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी केली होती. पटेलला स्ट्रेस फॅक्चर झाले आहे. त्याला फिट होण्यासाठी किमान 6 आठवड्यांचा वेळ लागेल. जडेजा आणि अक्षर हे दोन्ही डावखुरे स्पिनर टीममधून बाहेर पडल्यास आफ्रिका दौऱ्यातील प्लेईंग 11 मध्ये आर. अश्विनची (R. Ashwin) जागा पक्की आहे. दक्षिण आफ्रिकेतील फास्ट पिचवर टीम इंडिया फक्त 1 स्पिनर्ससह उतरण्याची दाट शक्यता आहे. निवड समिती जडेजा आणि अक्षरच्या जागी शाहबाज नदीम आणि सौरभ कुमार यांचा टीममध्ये समावेश करू शकते. सौरभ कुमार सध्या इंडिया ए टीमसोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत भारतीय बॅटरची कमाल, अजिंक्य रहाणेची जागा घेण्यासाठी सज्ज शुभमन गिलही दुखापतग्रस्त टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलच्या पायाची दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याला ही दुखापत झाली होती. मुंबई टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना त्याला हा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्याने नंतर फिल्डिंग केली नाही. तसंच दुसऱ्या इनिंगमध्ये तीन नंबरवर बॅटींग केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या