मुंबई, 02 जुलै : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी एंड्रिया हिच्या विरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गायक अंकित तिवारी यांचे पिता राजेंद्र कुमार तिवारी यांनी कांबळी दांपत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, मॉलमध्ये चालत असताना यांचा चुकून त्यांचा हात कांबळीच्या पत्नीला लागला. आणि याच्यावर चिडून विनोद कांबळीने हाणामारी करण्यास सुरूवात केली. हा सगळा प्रकार मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये घडला आहे. हेही वाचा…
राजेंद्र तिवारी यांच्या तक्रारीची दखल घेत कांबळी दांपत्यांवर बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 504 आणि कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ‘तिवारीने माझ्या पत्नीसोबत गैरवर्तन केलं. त्यामुळे मला त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याने वाईट पद्धतीने माझ्या पत्नीला स्पर्श केला. यासंदर्भात मी मुंबई पोलिसांनाही ट्विट केलं आहे.’ असं विनोद कांबळीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.