JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आफ्रिकेनं 24 तासामध्ये हिशोब चुकवला, पंजाबच्या खेळाडूची 5 बॉलमध्ये 30 रनची खेळी व्यर्थ

आफ्रिकेनं 24 तासामध्ये हिशोब चुकवला, पंजाबच्या खेळाडूची 5 बॉलमध्ये 30 रनची खेळी व्यर्थ

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं पुनरागमन केलं आहे. रविवारी झालेला दुसरा सामना आफ्रिकेनं 16 रननं जिंकत मालिकेत बरोबरी साधली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं पुनरागमन केलं आहे. रविवारी झालेला दुसरा सामना आफ्रिकेनं 16 रननं जिंकत मालिकेत बरोबरी साधली. पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने 161 रनचं आव्हान 15 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले होते. मात्र 24 तासांनी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेनं 167 रनचं टार्गेट वाचवत हिशोब चुकता केला. दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर्सचं या विजयात मोलाचं योगदान होते. 19 रन देऊन 2 विकेट्स घेणारा जॉर्ज लिंडे (George Linde) ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. वेस्ट इंडिजच्या पराभवातही पंजाब किंग्जचा (PBKS) फॅबियन एलन (Fabian Allen) चमकला. त्याने फक्त 12 बॉलमध्ये 34 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 30 रन तर 5 सिक्स लगावत पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 7 आऊट 166 रन काढले. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 150 पर्यंतच मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन टेंबा बावूमाने सर्वात जास्त 46 रन काढले. त्याने 33 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली. 15 ओव्हरमध्ये 15 सिक्स, T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलर्सची पिसं काढायला ही टीम तयार बावूमाशिवाय रिझा हेनरिक्सनं 30 बॉलमध्ये 42 रन काढले. वेस्ट इंडिजकडूम आबेद मकॉयने 25 रन देत 3 विकेट्स घेतल्या. 167 चा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजकडून सर्वात जास्त 35 रन आंद्रे फ्लेचरनं काढले. टीमचे स्टार खेळाडू असलेले ख्रिस गेल (8) कॅप्टन कायरन पोलार्ड (1), आंद्रे रसेल (5) आणि ड्वेन ब्राव्हो (10) रन काढून आऊट झाले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं 37 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या