JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'द्रविड-धोनी जोडीचा टीम इंडियाला होईल मोठा फायदा,' माजी अध्यक्षांचा सल्ला

'द्रविड-धोनी जोडीचा टीम इंडियाला होईल मोठा फायदा,' माजी अध्यक्षांचा सल्ला

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) समाप्त होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) समाप्त होणार आहे. या पदासाठी यापूर्वी माजी कॅप्टन आणि कोच अनिल कुंबळेचं (Anil Kumble) नाव चर्चेत होतं. पण, त्या नावावर बीसीसीआयमध्ये सहमती नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे बीसीसीआय विदेशी कोचची नियुक्ती करण्याच्या विचारात आहे. निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी या पदासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) हा आदर्श उमेदवार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर आगामी टी20 वर्ल्ड कपनंतरही महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रसाद यांनी ‘स्पोर्ट्स तक’ शी बोलताना सांगितले की, ‘राहुल द्रविडनं टीम इंडियाचा कोच व्हावं आणि महेंद्रसिंह धोनीनं मेंटॉर म्हणून काम करावं अशी माझी भावना आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कॉमेंट्री करत असतामा माझ्या सहकाऱ्यांशी मी या विषयावर चर्चा केली आहे. रवी भाईनंतर राहुल द्रविड हाच टीम इंडियासाठी चांगला ठरेल.’ T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच, दिग्गज भारतीयाचा पत्ता कट द्रविड-धोनी जोडी टीम इंडियासाठी वरदान ठरेल, असं मतही प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे. ‘कोच म्हणून राहुल द्रविड आणि मेंटॉर म्हणून धोनी ही जोडी भारतीय क्रिकेटसाठी वरदान ठरेल. दोघंही अतिशय शांत आहेत. यापैकी एक जण अतिशय अभ्यासू आहे, तर दुसरा मेहनती आहे. तसंच सध्या जे खेळाडू उदयाला आले आहेत, त्या सर्वांना इंडिया ए चा कोच म्हणून द्रविडनंच तयार केलं आहे.’ असं त्यांनी स्पष्ट केले. पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल आयपीएलमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण अनिल कुंबळे यांनी 2017 साली राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 टीम बनली. तसंच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्याच भारतीय टीमनं यश मिळवलं. मात्र, एकही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीमला यश आले नाही. आगामी टी20 वर्ल्ड कप ही रवी शास्त्रींना आयसीसी स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या