JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानची जर्सी पण नाव आणि नंबर धोनीचा, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

पाकिस्तानची जर्सी पण नाव आणि नंबर धोनीचा, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर एकदाही क्रिकेट खेळलेला नाही. सध्या तो चेन्नईत आयपीएलची तयारी करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 मार्च : भारताचा य़ष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या पुनरागमनापेक्षा निवृत्तीची चर्चा रंगत असते. आता आय़पीएलच्या तयारीला धोनीने चेन्नईत सुरुवात केल्यानं त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तानमध्ये असा एक चाहता आहे ज्याने पाकिस्तान सुपर लीग 2020 मध्ये धोनीचं नाव पाक क्रिकेट संघाच्या जर्सीवर लिहून घेतलं होतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएसएलमध्ये 22 व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धोनीचं नाव आणि नंबर पाकिस्तानी संघाच्या जर्सीवर त्याने लिहून घेतला होता. पाकिस्तानी जर्सीवर धोनीचे नाव आणि नंबर असलेला फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करताना म्हटलं की, स्टेडियममध्ये माही, पीएसएल आणि इस्लामाबाद युनायटेडला पूर्ण पाठिंबा.  स्टेडियममध्ये गर्दी होती पण मिसिंग धोनी. याआधीही पाकिस्तानी चाहता धोनीची जर्सी घालून आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कपवेळी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. शेहजाद अल हसन नावाच्या युजरने ट्विटरवर धोनीच्या नावाची जर्सी असलेला फोटो शेअर केला आहे.भार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी खेळाडूंच्या आय़पीएलमधील कामगिरीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळं धोनीला आपला स्ट्राइक रेट चांगला करावा लागले. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सचिनसह अनेक दिग्गजांनी धोनीच्या स्ट्राइक रेटवर टीका केली. त्यामुळं धोनीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कमबॅक करायचा असल्यास त्याला आपली मॅच विनिंग खेळी पुन्हा करावी लागेल. हे वाचा : IPL 2020 : पाकमुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत गेल्या महिन्यात पाकिस्तान क्रिकेट लीगला सुरुवात झाली. पीएसएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जात आहेत. गेल्या चार हंगामात सुरक्षेच्या कारणास्तव युएईमध्ये सामने आयोजित केले गेले. 2016 मध्ये पहिल्यांदा पीएसएलचे आयोजन करण्यात आलं होतं. हे वाचा : LIVE सामन्यात पंचांनाच लागला चेंडू, मैदानावरच कोसळले आणि… पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या