लाहोर, 10 मार्च : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा गंभीर आणि मजेशीर घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर हसून हसून पोट धरायला लावणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या पाचवा हंगाम सुरु आहे. दरम्यान, पीएसएलमध्ये लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात रविवारी रात्री सामना झाला. या सामन्यात झेल घेण्यासाठी फलंदाजाचे पाय धरलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. लाहोर कलंदरचा फलंदाज बेनला बाद करण्याच्या प्रयत्नात कराची किंग्जचा यष्टीरक्षक चाडविक वॉल्टनने फलंदाजाचे पायच धरले. लाहोर कलंदरच्या डावाच्या 10 व्या षटकात हा प्रकार घडला. कॅमरन डेलपोर्टच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न बेनने केला. चेंडू बॅटला लागला तेव्हा यष्टीरक्षक वॉल्टनने झेल घेण्यासाठी अतिउत्साहात तत्परता दाखवली. त्याला वाटलं की फलंदाजाला पकडल्याशिवाय झेल घेता येणार नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यष्टीरक्षकाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तान सुपर लीगनेसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यारो यही दोस्ती है, किस्मत से जो मिली है असा कॅप्शनही दिला आहे. हे वाचा : ऑस्ट्रेलियाला मिळाली ‘छोटी’ सचिन, 6 वर्षांच्या मुलीला पाहून घाबरला ब्रेट ली सामन्यात पुन्हा एकदा बेन डंकने जबरदस्त खेळी केली. त्याने 40 चेंडूत 99 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर लाहोरने कराचीला 8 गडी राखून पराभूत केलं. कराचीकडून अॅलेक्स हेल्सने 48 चेंडूत 88 धावा केल्या. लाहोर कलंदर पीएसएलमध्ये गुणतक्त्यात तळाला आहे. त्यांना फक्त तीन सामने जिंकता आलेत. तर मुल्तान सुल्तानने पाच सामने जिंकून पहिलं स्थान पटकावलं आहे. हे वाचा : WhatsAppवर बोलावं तसं ट्विटरवर चॅट, डिव्हिलियर्सच्या रिप्लायनंतर विराट बसला गप्प