JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मित्राच्या मुलानं केली आफ्रिदीची धुलाई, बूम-बूमच्या बॉलिंगवर सिक्सचा पाऊस

मित्राच्या मुलानं केली आफ्रिदीची धुलाई, बूम-बूमच्या बॉलिंगवर सिक्सचा पाऊस

पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) मधील सामन्यात शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) बॉलिंवर त्याच्या मित्राच्या मुलानं जोरदार फटकेबाजी केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी: पाकिस्तानचा क्रिकेटपटू आझम खानचा (Azam Khan) जन्म 1998 साली झाला. त्यावेळी त्याचे वडील मोईन खान (Moin Khan) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हे पाकिस्तानच्या टीममध्ये एकत्र खेळत होते. मोईन खान 2005 साली निवृत्त झाला. त्यानंतर तो पाकिस्तानचा कोचही होता. त्याने दुसरी इनिंग बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू केली आहे. आफ्रिदी मात्र अजूनही क्रिकेट खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये एकत्र खेळलेले हे दोन मित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोईन खान सध्या त्याचा मुलगा आझम खानमुळे चर्चेत आहे. आझमनं पाकिस्तान सुपर लीगमधील (PSL 2022) सामन्यात आफ्रिदीच्या बॉलिंगची जोरदार धुलाई केली. इस्लामाबाद युनायटेड विरूद्ध क्वेट्टा ग्लेडिएटर्स यांच्यातील मॅचमध्ये आफ्रिदीनं अत्यंत महागडा स्पेल टाकला. इस्लामाबादनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 229 रन केले. आफ्रिदीनं शेवटची ओव्हर टाकली. त्यावेळी त्याच्यासमोर आझम बॅटींग करत होता. आझमने आफ्रिदीच्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

संबंधित बातम्या

दुसऱ्या बॉलवर दोन रन काढले. तर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर पुन्हा सिक्स लगावले. आझमनं आफ्रिदीच्या 4 बॉलमध्येच 20 रन काढले होते. अखेर आफ्रिदीनं पाचव्या बॉलवर आझमला आऊट केले. पण, त्यापूर्वी त्यानं 35 बॉलमध्ये 65 रन केले होते. शाहिद आफ्रिदी संपूर्ण मॅचमध्ये चांगलाच महागडा ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 67 रन देत 1 विकेट घेतली. त्याच्या 4 ओव्हर्समध्ये इस्लामाबादच्या बॅटरनं 8 सिक्स लगावले. भारत दौऱ्यानंतर श्रीलंकन खेळाडू होणार निवृत्त, घोषणा करताच केला मोठा करार इस्लामाबादनं दिलेलं 230 रनचं आव्हान क्वेटाला पेलवलं नाही. त्यांची टीम 186 रनवरच ऑल आऊट झाली. इस्लामाबादकडून कॅप्टन शादाब खाननं 5 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या