मुंबई, 26 मे: पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र त्याची क्रिकेट विश्वातील चर्चा कायम आहे. तो आता जगभरातील टी20 लीगमध्ये खेळणार आहे. आमिरने नुकताच कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (CPL) बार्बोडस ट्रायडंट्स या टीमशी करार केला आहे. आमिर यंदा पहिल्यांदाच सीपीएलमध्ये खेळणार आहे. आमिर सध्या ब्रिटीश नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याची चर्चा आहे. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना आमिरने ही चर्चा कशी सुरु झाली यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “माझी पत्नी ब्रिटीश नागरिक आहे. त्यामुळे मी देखील ब्रिटनचे नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. माझी मुलं देखील ब्रिटनमध्ये शिकतील.’’ असे आमिरने सांगितले.
टी20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स मोहम्मद आमिरचा टी20 क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने 190 मॅचमध्ये 220 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरने एका मॅचमध्ये चार विकेट्स घेण्याची कामगिरी पाच वेळा तर पाच विकेट्स घेण्याची कामगिरी दोन वेळा केली आहे. त्याचा इकॉनॉमी रेट जवळपास सात आहे. आमिरने 50 आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर 36 टेस्टमध्ये 119 आणि 61 वन-डेमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. टीम मॅनेजमेंटशी झालेल्या वादामुळे त्याने निवृत्ती घेतली आहे. ‘मी तिचा मालक नाही…’, पत्नीच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणने सुनावलं अक्रमने केला आमिरचा बचाव मोहम्मद आमिरकडे टीम मॅनेजमेंटनं केलेल्या दुर्लक्षाबद्दल अक्रमने टीम मॅनेजमेंटला सुनावले आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठीच्या पाकिस्तान टीममध्ये आमिर हवा आहे, असे अक्रमने स्पष्ट केले. “आमिरने टेस्ट क्रिकेट सोडले असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याचा कुणाला राग येण्याची गरज नाही. दुसऱ्या खेळाडूंनी असं केल्यानंतर त्यांना कुणी काही म्हंटले नाही. तर, आमिरसाठीच हा भेदभाव का? तो दुसऱ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी तयार असेल तर त्याची निवड करायला हवी.’’ असे अक्रमने म्हंटले आहे.