JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PAK vs WI: कोरोनामुळे आणखी एका सीरिजचा बळी, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

PAK vs WI: कोरोनामुळे आणखी एका सीरिजचा बळी, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

क्रिकेट विश्वाला लागलेलं कोरोनाचं (Coronavirus) ग्रहण अद्याप सुटलेलं नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक स्पर्धा यामुळे रद्द झाल्या आहेत. आता यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : क्रिकेट विश्वाला लागलेलं कोरोनाचं (Coronavirus) ग्रहण अद्याप सुटलेलं नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक स्पर्धा यामुळे रद्द झाल्या आहेत. आता यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) यांच्यातील वन-डे सीरिज कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वेस्ट इंडिज टीममध्ये झालेल्या कोरोना ब्लास्टमुळे (Corona Blast) हा निर्णय घेण्यात आला. आता जून 2022 मध्ये ही सीरिज होणार आहे. वेस्ट इंडिजची टीम 21 सदस्यांसह पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. मात्र बुधवारी झालेल्या शेवटच्या टी20 साठी त्यांचे फक्त 14 खेळाडू उपलब्ध होते. या टीममधील 6 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर  डेवॉन थॉमस हा खेळाडू पहिल्या टी20 सामन्यात बोटाला दुखापत झाल्याने सीरिजमधून आऊट झाला आहे. या सर्व संकटात तिसरी टी20 होणार की नाही? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. पण वेस्ट इंडिज बोर्डाला हा सामना खेळण्यासाठी तयार करण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) यश आले. कोणत्या खेळाडूंना कोरोना? वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार टीममधील आणखी 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विकेट किपर - बॅटर शाही होप (Shai Hope), स्पिनर अकिल हुसेल (Akil Hosein) आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस ( Justin Greaves) हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याचबरोबर वेस्ट टीमचे असिस्टंट कोच आणि फिजिशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे. विराट कोहलीबाबत BCCI चं धोरण ठरलं, सौरव गांगुलीनं घेतला मोठा निर्णय यापूर्वी वेस्ट इंडिज टीममधील  फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell), ऑल राऊंडर रोस्टन चेज (Rosten Chase) आणि काईल मेयर्स (Kyle Mayers) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर गैर कोचिंग स्टाफमधील एक सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. वेस्ट इंडिज टीममधील कोरोना संकटामुळेच 18 डिसेंबरपासून सुरू होणारी वन-डे सीरिज स्थगित करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या