JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वेस्ट इंडिजवर बरसले 'वीरू'चे 'शोले', सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

वेस्ट इंडिजवर बरसले 'वीरू'चे 'शोले', सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस (8 डिसेंबर) खास आहे. या दिवशी वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) जबरदस्त बॅटींग करत सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 डिसेंबर : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस (8 डिसेंबर) खास आहे. या दिवशी टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंदूरमधील होळकर स्टेडियमवर आजच्या दिवशी झालेल्या (8 डिसेंबर 2011)  मॅचमध्ये भारतीय टीमने त्यांचा आजवरील वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर केला. आक्रमक बॅटर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) या मोठ्या स्कोअरचा शिल्पकार होता. वीरूच्या वादळाने त्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही (Sachin Tendulkar) रेकॉर्ड मोडला होता. वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची धुलाई करत 149 बॉलमध्ये 219 रननची खेळी केली.  या खेळीत त्याने 25 फोर आणि 7 सिक्सचा वर्षाव केला होता. त्याने ही खेळी करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची  वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी मागे टाकली होती. सचिनने यापूर्वी 200 रनची खेळी केली होती. वन-डे क्रिकेटमधील पहिले द्विशतक सचिनने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 2010 साली झळकावले होते.

संबंधित बातम्या

6 जणांनीच लगावले आहे द्विशतक वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 2014 साली कोलकाकामध्ये 173 बॉलमध्ये 33 फोर आणि 9 सिक्ससह 264 रन केले होते. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलिया (209) आणि श्रीलंका (208*) अशी आणखी 2 द्विशतकं झळकावली आहेत.   सचिन, सेहवाग आणि रोहिसह मार्टीन गप्टील (237*), ख्रिस गेल (215) आणि फखर जमां (210) या 3 अन्य बॅटर्सनी वन-डे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावले आहे. वर्षभरातील हिरो, ऑस्ट्रेलियात Zero! विराटला टशन देणारा खेळाडू फेल, VIDEO या सहा जणांमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल हे दोन असे खेळाडू आहेत, ज्यांच्या नावावर टेस्टमध्ये दोन त्रिशतक आणि वन-डेमध्ये द्विशतकाची नोंद आहे. गेलने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 317 आणि श्रीलंकेविरुद्ध 333 रनची खेळी केली होती. तर सेहवागने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 319 आणि पाकिस्तान विरुद्ध 309 रन काढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या