Moeen Ali
दुबई, 23 ऑक्टोबर : टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर-12 फेरीतील सामन्यांना 23 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या (West Indies vs England) सामन्यात लाजिरवाणी कामगिरी केली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने अप्रतिम खेळी करत इंडिज फलंदाजांना(moeen ali man of the match against west indies credits csk for his performance for england) गुडघे टेकायला लावले. सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना मोईन अलीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात 4 षटक गोलंदाजी केली आहे. या दरम्यान त्याने योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत अवघ्या 17 धावा खर्च केल्या होत्या. तसेच दोन गडी देखील बाद केले. यामध्ये एक निर्धाव षटकाचा देखील समावेश आहे. यासह त्याने ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर एक भन्नाट झेल देखील टिपला होता. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीचे श्रेय त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला दिले आहे. सामन्यानंतर तो म्हणाला की, “मी अजिबात घाबरलो नव्हतो. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी माझी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे. मला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये योगदान देऊन बरे वाटले. विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळणे चांगले होते.” अशी भावना त्यांना यावेळी व्यक्त केली.
इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगला बोलावल्यावर वेस्ट इंडिजचा संघ फक्त 55 रनवर ऑल आऊट झाला.वेस्ट इंडिजच्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 8.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला.