JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'इंग्लंड दौऱ्यावर विराट सर्वात जास्त रन काढेल, पण टीम इंडिया...' मायकल वॉनचा दावा

'इंग्लंड दौऱ्यावर विराट सर्वात जास्त रन काढेल, पण टीम इंडिया...' मायकल वॉनचा दावा

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने (Michael Vaughan) टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. हमी खळबळजनक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वॉनने या दौऱ्याचं भविष्य सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने (Michael Vaughan) टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्धची 5 कसोटीची मालिका इंग्लंडमध्ये खेळणार आहे. या दौऱ्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. नेहमी खळबळजनक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वॉनने या दौऱ्याचं भविष्य सांगितलं आहे. वॉनने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन असेल, मात्र तरीही टीम इंडिया पराभूत होईल. ‘इंग्लंडची टीमभारतामध्ये गेल्यावर त्यांचा नेहमी मोठा पराभव झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडमध्ये आल्यावर त्याच्या उलटे घडते. इंग्लंडची टीम होम ग्राऊंडवर भक्कम आहे. या मालिकेत सर्वात जास्त रन विराट कोहली आणि  जो रूट काढतील. तर जसप्रीत बुमराह आणि ख्रिस वोक्स सर्वात जास्त विकेट्स घेतील.” असे भविष्य वॉनने व्यक्त केले आहे. रोहित शर्माची प्रशंसा वॉनने यावेळी बोलताना रोहित शर्माची (Rohit Sharma) प्रशंसा केली आहे. त्याला एखाद्या आयपीएल टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली तर रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्समध्ये खेळण्यास आवडेल, असे त्याने सांगितले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या एखाद्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये समावेश करायचा असेल तर तो खेळाडू रोहित असेल, असे वॉनने सांगितले. वडिलांच्या आठवणीने सौरव गांगुली भावुक, फोटो शेअर करत म्हणाला… विराट कोहली आणि रोहित शर्मापैकी कोणत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी पैसे खर्च करशील या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र वॉनने कोहलीचे नाव घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या