JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : टीम इंडियाला पराभूत केल्यानंतरही विल्यमसननं जिंकलं भारतीयांचं मन

WTC Final : टीम इंडियाला पराभूत केल्यानंतरही विल्यमसननं जिंकलं भारतीयांचं मन

फायनलमध्ये टीम इंडियाला (Team India) पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं भारतीयांचं मन जिंकलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून: साऊथम्पटनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. तब्बल 21 वर्षांनी न्यूझीलंडनं आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हे विजेतेपद आणखी ऐतिहासिक आहे. फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं भारतीयांचं मन जिंकलं आहे. विजेतेपदानंतर  विल्यमसननं विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाबद्दल (Team India) दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्याने भारतीयांचं मन जिंकलं आहे.  " मी विराट कोहली आणि भारतीय टीमचा आभारी आहे. ती एक जबरदस्त टीम आहे. आमच्यासमोर केवढं मोठं आव्हान होतं याची मला कल्पना आहे.  आम्ही हा विजय मिळवू शकलो याचा आनंद आहे.  आम्ही पहिल्यांदाच विश्वविजेतेपद घेऊन जाणार आहोत. हे विजेतेपद पटकवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, ते सर्व प्रशंसेसाठी पात्र आहेत. हे विजेतेपद दीर्घकाळ स्मरणात राहील." अशी भावना विल्यमसननं व्यक्त केली. रॉस टेलर झाला भावुक 108 टेस्टचा अनुभव असलेल्या रॉस टेलरनं (Ross Taylor) दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 47 रन काढले. तो टीमला विजय मिळवूनच परतला. मॅच संपल्यानंतर टेलर चांगलाच इमोशनल  झाला होता. “हे विजेतेपद आयुष्यभर लक्षात राहील अशी भावुक प्रतिक्रिया टेलरनं व्यक्त केली. मॅचनंतर दिसली दोन्ही कॅप्टनची मैत्री, क्रिकेटच्या मैदानातील सुंदर फोटो Viral " मॅचच्या दरम्यान खूप पाऊस झाला. आमच्या टीमनं सुरुवातीला संघर्ष केला, पण त्यानंतर पुनरागमन करत  विजेतेपद पटकावले. हे मी आयुष्यभर विसरु शकत नाही. आमच्यावर दबाव होता,  हे नाकारता येणार नाही. पण आम्ही दबावामध्ये चांगली बॅटिंग केली.” असं टेलर  यावेळी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या