JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऋद्धीमान साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराला होणार शिक्षा, BCCI करणार मोठी कारवाई!

ऋद्धीमान साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराला होणार शिक्षा, BCCI करणार मोठी कारवाई!

टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) एका पत्रकारानं धमकी दिल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलंच गाजलं. या पत्रकारानं मुलाखत देण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा साहानं केला होता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल : टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) एका पत्रकारानं धमकी दिल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलंच गाजलं. या पत्रकारानं मुलाखत देण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा साहानं केला होता. या प्रकरणाचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले. या विषयावर बीसीसीआयनं नेमलेल्या तीन समितीनं पत्रकार बोरिया मजुमदार (Boria Majumdar) दोषी असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात मजमुदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे. ‘सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना आम्ही सूचना करणार आहोत. त्यांना भारतामधील कोणत्याही सामन्यांसाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात येणारी सुविधा (media accreditation) मिळणार नाही. त्याचबरोबर आयसीसीला देखील या प्रकरणात पत्र लिहून मजमूदारला ब्लॅकलिस्ट करण्याची विनंती करणार आहोत,’ अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘संडे एक्स्प्रेस’ला दिली आहे. या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मजमूदार यांनी नकार दिला आहे. काय आहे प्रकरण? टीम इंडियाकडून 40 टेस्ट मॅच खेळणाऱ्या साहानं फेब्रुवारी महिन्यांत पत्रकारासोबतचे व्हॉट्सअप मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले होते.या स्क्रीनशॉटनुसार तो पत्रकार साहाला म्हणतो की, ‘मला मुलाखत दिलीस तर चांगले होईल. त्यांनी (निवड समिती) फक्त एक विकेट किपर निवडला आहे. तू 11 पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केलास. माझ्या मते ते बरोबर नाही. तुला जास्त मदत करू शकेल त्याची निवड कर. तू माझा कॉल घेतला नाहीस. मी आता तुझी कधीही मुलाखत घेणार नाही. मी ही गोष्ट लक्षात ठेवेन.’ भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार 2 देशांमध्ये सामने साहाच्या या ट्विटनंतर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह क्रिकेट विश्वातील अनेकांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर बीसीसीआयनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत  तीन सदस्यीय विशेष समितीची स्थापना केली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरूण सिंह धूमळ आणि बोर्डाच्या मुख्य परिषदेचे सदस्य प्रभतेज सिंह भाटीया यांचा या समितीमध्ये समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या