मुंबई, 1 डिसेंबर : टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल (KL Rahul) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. राहुल पंजाब टीमचा कॅप्टन होता. राहुलला टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पण, त्याची थांबण्याची इच्छा नव्हती, असा खुलासा पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी केला आहे. कॅप्टन, ओपनर आणि विकेट किपर अशी तिहेरी भूमिका बजावणाऱ्या राहुलने टीम सोडणे पंजाबसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनिल कुंबळे यांनी पंजाबच्या मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता राहुलनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमधील सर्व खेळाडूंची रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलनं प्रतिक्रिया दिली आहे. राहुलनं याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘तो प्रवास सुंदर होता. तुमच्या प्रेमासाठी आभार. आता दुसऱ्या बाजूला भेटू’ असं ट्विट राहुलनं पंजाबची जर्सी घातलेल्या फोटोसह केले आहे.
पंजाबनं केली राहुलची तक्रार आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघ दाखल होणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी 3 जणांना मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे. धोनी, रोहितनं केली नव्या करारावर स्वाक्षरी, Hitmanची स्टाईल सर्वात हटके! पाहा VIDEO दरम्यान, नव्या संघाविरोधात पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) बीसीसीआयकडे(BCCI) तक्रार केली आहे.‘नवीन फ्रेंचायझी राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी पंजाब आणि हैदराबाद संघाने तक्रार केली आहे, इनसाइड स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे.