चेन्नई, 21 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनची (IPL 2021) सांगता झाल्यापासून क्रिकेट फॅन्समध्ये एका प्रश्नावर मोठी चर्चा होत आहे. आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुढील आयपीएल स्पर्धा खेळणार का? हा तो प्रश्न आहे. सीएसकेनं आयपीएल जिंकल्याबद्दल त्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी एक खास कार्यक्रम शनिवारी चेन्नईत झाला. या कार्यक्रमात स्वत: धोनीनंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. काय म्हणाला धोनी? धोनी या कार्यक्रमात म्हणाला की, ‘IPL 2022 साठी आणखी बराच वेळ आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. ही स्पर्धा एप्रिल महिन्यात होणार आहे.’ मी माझी जागा अजून सोडलेली नाही, असंही धोनीनं या कार्यक्रमात स्पष्ट केलं. धोनीचं हे वक्तव्य तो पुढील आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याचे संकेत मानले जात आहे. ‘मी माझ्या क्रिकेट करिअरचं नेहमीच प्लॅनिंग केलं आहे. मी भारतामधील शेवटची वन-डे मॅच माझं गाव असलेल्या रांचीमध्ये खेळलो. कदाचित मी शेवटची टी20 मॅच चेन्नईत खेळेल. ती मॅच पुढच्या वर्षी असेल की आणखी पाच वर्षांनी हे ठरवायला अजून वेळ आहे.’ असे धोनीने सांगितले.
आयपीएलच्या पुढील सिझनमध्ये 8 च्या जागी 10 टीम खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीम पुढील आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहेत. आयपीएल फायनल झाल्यानंतर धोनीनं सांगितलं होतं की,‘CSK च्या हितासाठी काय असेल याचा आम्ही निर्णय घेऊ. आम्हाला मजबूत टीम तयार करायची आहे. फ्रँचायझीच्या हितासाठी काय चांगले आहे, काय नाही याबाबत आम्ही विचार करू. आम्ही पुढच्या 10 वर्षांचा विचार करून टीम बनवणार आहोत. IPL 2022: भारतीय फॅन्ससाठी Good News, पुढच्या सिझनबाबत BCCI नं केली मोठी घोषणा