IPL 2022 Mega Auction: आयपीएल स्पर्धेच्या या सिझनसाठी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना 10 नियमांचं पालन करावं लागणार आहे.
मुंबई, 3 फेब्रुवारी: आयपीएल स्पर्धेच्या या सिझनसाठी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यंदा 10 टीम 590 खेळाडूंवर बोली लावणार आहेत. त्यामुळे दोन्ही दिवस जोरदार चुरस रंगणार आहे. मेगा ऑक्शनच्या दरम्यान कोरोनाचं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी बीसीसीआयनं सर्व फ्रँचायझींना नियमावली जारी केली आहे. या ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना 10 नियमांचं पालन करावं लागणार आहे.
लिलावात सहभागी होणाऱ्या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांची 9, 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार आहे. बीसीसीआयची मान्यता असलेल्या लॅबमध्ये ही चाचणी होईल. सर्व अधिकाऱ्यांना या चाचणी दरम्यान कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येणे आवश्यक आहे.
यंदा कोणत्याही टीमकडे राईट टू मॅच (RTM) कार्ड नाही. त्यामुळे जुन्या आठ टीमना आपले पूर्वीेचे खेळाडू पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना ऑक्शनमध्ये खरेदी करणे हा एकच उपाय आहे.
सर्व टीमचे एकूण बजेट यंदा 90 कोटी इतकं वाढवण्यात आले आहे.
ऑक्शनच्या 15 दिवस आधी भारतामध्ये दाखल झालेल्या विदेशी व्यक्तींना 7 दिवस क्वारंटाईन राहणे अनिवार्य आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आठव्या आणि नवव्या दिवशी त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल. या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना प्रत्यक्ष ऑक्शनमध्ये सहभागी होता येणार आहे.
11 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमधील हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या सर्व व्यक्तींची बीसीसीआय काटोकोर तपासणी करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.