मुंबई, 19 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) आज म्हणजेच 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा टप्पा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) ही स्पर्धा कोण जिंकणार याची भविष्यवाणी केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचनं दुसरा टप्पा सुरु होणार आहे. ‘नजफगडचा नवाब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिग्गजानं सांगितलं की आयपीएल स्पर्धा आता यूएईमध्ये स्थलांतरित झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स (MI) विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. तसंच दिल्ली कॅपिटल्सकडंही (DC) चांगली संधी आहे. सेहवागनं ‘हिंदुस्थान टाईम्स’ शी बोलताना हे भाकित केले. सेहवाग यावेळी म्हणाला, ‘दुसऱ्या टप्प्यात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. माझ्या मते दिल्ली आणि मुंबईची टीम विजेतेपदाची दावेदार असेल. पहिल्या टप्प्यात चेन्नईचा सरासरी स्कोअर 201 होता. पण यूएईच्या पिचवर त्यांच्या बॅटींगवर परिणाम होईल, असं मला वाटतं. मला एका टीमची निवड करायची असेल तर ती टीम मुंबई असेल,’ असं सेहवाहनं स्पष्ट केलं. IPL 2021 : मुंबईचा मुकाबला चेन्नईशी, अशी असणार रोहितची Playing XI टी20 वर्ल्ड कपवर होणार परिणाम सेहवागनं पुढं सांगितलं की, ‘आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये काही बदल होऊ शकतो. प्रत्येक टीमच्या किमान 7 मॅच होणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच चांगली कामगिरी करण्यासाठी योग्य स्टेज आहे. टीम इंडियाच्या स्टार बॉलरला जगापासून लपवण्याची होती कोच रवी शास्त्रींची इच्छा! या स्पर्धेकडं बारीक लक्ष असणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांना प्रभावित करण्याची निवड समितीला संधी असेल. आयसीसीनं देखील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टीममध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट टीममध्ये काही बदल झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.’