JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: 'ही दोस्ती तुटायची नाय' ; धोनीसोबतचा photo share करत रैनानं लिहिला emotional message

IPL 2021: 'ही दोस्ती तुटायची नाय' ; धोनीसोबतचा photo share करत रैनानं लिहिला emotional message

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सरावादरम्यान महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्या मैत्रीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल :  इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) जोरदार तयारी सुरु केली आहे. चेन्नईची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे. चेन्नईच्या सरावादरम्यान महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्या मैत्रीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. सुरेश रैनानं त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘डोळ्याला डोळे नाही पण हृदयाला हृदय नक्की मिळतं. असं कॅप्शन रैनानं दिलं असून त्यानंतर दोन हार्टच्या इमोजी वापरल्या आहेत. रैना आणि धोनीचा हा फोटो क्रिकेट फॅन्समध्ये चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मागच्या वर्षी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान (IPL 2020) धोनी आणि रैना यांच्यात  दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. रैनानं वैयक्तिक कारणामुळे मागील आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली होती.

संबंधित बातम्या

महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे परस्परांचे घट्ट मित्र आहेत. हे दोघेही अगदी पहिल्या सिझनपासून चेन्नई सुपर किंग्सचे सदस्य आहेत. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये देखील ते अनेक वर्ष एकत्र खेळले आहेत. धोनीनं मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या घोषणेनंतर काही वेळातच रैनानं देखील निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ( वाचा :  On This Day : वेस्ट इंडिज, इंग्लंडमध्ये इतिहास रचणाऱ्या भारताच्या महान कॅप्टनचा जन्म ) यंदाच्या आयपीएलसाठी रैना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून खेळणार आहे. त्यानं टीमच्या इतर खेळाडूंसोबत प्रॅक्टीस देखील सुरु केली आहे. चेन्नईच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन खेळाडूंच्या प्रॅक्टीसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सातत्याने प्रसिद्ध केले जातात. याच मालिकेत धोनी आणि रैना यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या