JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: अंपायरच्या निर्णयाचा पंजाबला झाला मोठा फायदा, KKR ठरली दुर्दैवी

IPL 2021: अंपायरच्या निर्णयाचा पंजाबला झाला मोठा फायदा, KKR ठरली दुर्दैवी

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS beat KKR) 5 विकेट्सनं पराभव केला. पंजाबच्या या विजयात थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयाचाही हातभार होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 ऑक्टोबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS beat KKR) 5 विकेट्सनं पराभव केला. केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 165 रन काढले. पंजाबनं 166 रनचं लक्ष्य 3 बॉल राखत पूर्ण केलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये थर्ड अंपायरचा एक निर्णय वादग्रस्त ठरला. त्या निर्णयाचा पंजाबला मोठा फायदा झाला तर कोलकाताची टीम दुर्दैवी ठरली. काय घडला प्रकार? पंजाबच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या मॅचमध्ये केएल राहुलचा (KL Rahul) कॅच राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi Catch) पकडला होता. या कॅचनंतर केकेआरनं जल्लोष केला. पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. थर्ड अंपायरनं राहुल नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला.  थर्ड अंपायरनं दिलेल्या या निर्णयाचा या मॅचची कॉमेंट्री करणारे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, आकाश चोप्रा आणि इरफान पठाण यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर राहुलनं पुल शॉट खेळला होता. तो बॉल मिडविकेटच्या दिशेनं गेला. त्यावेळी राहुल त्रिपाठीनं पुढे झेपावत तो पकडला. ती मॅचमधील निर्णयाक वेळ होती. राहुल आऊट वाटत होता. पण तिसऱ्या अंपायरनं तो नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. राहुलनं कॅच घेताना बॉल जमिनिला लागला, असा निर्णय तिसऱ्या अंपायरनं दिला. IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी माजी क्रिकेटपटूंना धक्का तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयाचा मॅचची कॉमेंट्री करणारे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांना धक्का बसला. त्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. गंभीर आणि इराफानच्या मते राहुल आऊट होता. आकाश चोप्राचं देखील तेच मत होतं. थर्ड अंपायरनं राहुलला नॉट आऊट दिलं तेव्हा पंजाबला विजयासाठी 15 रन हवे होते. राहुलनं त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये फोर लगावला. थर्ड अंपायरचा निर्णय केकेआरच्या बाजूनं गेला असता तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं ठरलं असतं. ORANGE CAP: कोलकाताचा ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यरने शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलला आऊट केलं. राहुल आऊट झाला तेव्हा पंजाबला विजयासाठी 4 बॉलमध्ये 4 रनची गरज होती. तेव्हा शाहरुख खानने सिक्स मारत पंजाबला जिंकवून दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या