मुंबई, 16 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद (IPL 2021 Final) पुन्हा एकदा पटकावलं आहे. शुक्रवारी झालेल्या फायनलमध्ये चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 27 रननं पराभव केला. चेन्नईच्या या विजेतेपदामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. मागील आयपीएल सिझनमध्ये फ्लॉर गेलेल्या टीमची त्यानं कुशलतेनं हाताळणी करत स्पर्धेचं विजेतेपद पटाकवलं. या विजयानंतर सीएसकेचा आयपीएल ट्रॉफीवर हक्क नव्हता, असं धोनीनं सांगितलं. धोनी मॅच संपल्यानंतर कॉमेंटेटर हर्षा भोगलेशी बोलताना म्हणाला की, ‘चेन्नईच्या विजयापूर्वी केकेआरबद्दल बोललं पाबिदे. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी या सिझनमध्ये ज्या पद्धतीनं प्रदर्शन केलं त्याची प्रशंसा करायला हवी. पहिल्या हाफमध्ये केकेआरनं 7 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सर्व मॅच जिंकत फायनलमध्ये जागा मिळवणं ही मोठी गोष्ट आहे. यासाठी त्यांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचं कौतुक करायला हवं. ते खऱ्या अर्थानं विजयाचे दावेदार होते.’ केकेआरचे ओपनर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी चेन्नईच्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. या दोघांनी 8.1 ओव्हरमध्ये 61 रनची पार्टनरशीप केली. शुभमन गिलने 51 रन आणि व्यंकटेश अय्यरने 50 रन केले. यानंतर मात्र केकेआरची बॅटिंग गडगडली. 34 रनवरच कोलकात्याने 8 विकेट गमावल्या. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जॉस हेजलवूड आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. दीपक चहर आणि ड्वॅन ब्राव्होने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. चौथ्या आयपीएल विजेतेपदानंतर रिटायरमेंटबद्दल काय म्हणाला धोनी? VIDEO आयपीएल इतिहासात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सना दोन वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे. लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम दुसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिली. पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईने दिल्लीचा पराभव करत फायनल गाठली, तर कोलकात्याने आरसीबी आणि दिल्लीचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नई सुपर किंग्सची ही रेकॉर्ड नववी फायनल होती.