मुंबई, 24 सप्टेंबर : आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा हाफ (IPL 2021 2nd Phase) सध्या यूएईमध्ये सुरू आहे. या स्पर्धेची फायनल 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच 2 दिवसांनी टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. निवड समितीनं या वर्ल्ड कपसाठी 15 जणांची टीम जाहीर केली असून 3 जणांची स्टँडबाय म्हणून निवड केली आहे. सध्या आयपीएल स्पर्धा सुरू असली तरी बीसीसीआयला टी20 वर्ल्ड कपची काळजी सतावत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व आयपीएल टीम्सना पत्र लिहून एक खास विनंती केली आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंचा वर्कलोड कमी करण्याचं आवाहान बीसीसीआयनं आयपीएल टीम्सना केलं आहे. या आवाहानचा परिणाम दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच मॅचमध्ये दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात झालेल्या या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे दोघं जण खेळले नव्हते. ‘इनसाईड स्पोर्ट्स’ च्या बातमीनुसार हा केवळ योगायोग नव्हता. या दोघांना टी20 वर्ल्ड कपचा विचार करुन आराम देण्यात आला होता. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘इनसाइड स्पोर्ट्स’ ला दिलेल्या माहितीनुसार, ‘रोहित शर्मा हा टी20 वर्ल्ड कपसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत आम्हाला कोणताही धोका पत्कारायचा नाही. पहिल्या मॅचमध्ये रोहितला विश्रांती देणे हा चांगला निर्णय होता. कारण, रोहित अजूनही त्याला झालेल्या दुखापतीमुळे सावरलेला नाही. टी20 वर्ल्ड कपला आमचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंचा वर्कलोड जितका शक्य आहे तितका कमी करण्याचा सल्ला आम्ही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सला दिला आहे.’ IPL 2021: ‘या’ कारणामुळे चेन्नईविरुद्ध खेळला नाही रोहित, मोठ्या नियोजनाचा आहे भाग विराट आणि बुमराह करणार आराम? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘विराट कोहली हा टीममधील सर्वात फिट खेळाडूपैकी एक आहे. तो जास्त मॅच खेळला तर फॉर्ममध्ये येऊ शकतो. पण आयपीएलच्या सेकंड हाफमधील सर्व मॅच खेळायच्या की नाही, याचा निर्णय विराटला घ्यायचा आहे.’ धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे टीम इंडियानं जिंकला होता World Cup, 14 वर्षांनी पुन्हा इतिहास रचण्याची संधी जसप्रीत बुमराहनं इंग्लंडमध्ये 151 ओव्हर्स बॉलिंग केली आहे. भारतीय फास्ट बॉलर्सना दुखापतीचा इतिहास आहे. त्यामुळे बुमराहबद्दल कोणताही धोका पत्कारु नये अशी सूचना मुंबई इंडियन्सला करण्यात आली आहे.