JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Vaathi Coming: द. आफ्रिकेविरुद्ध जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंचा 'Master' डान्स, पाहा VIDEO

Vaathi Coming: द. आफ्रिकेविरुद्ध जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंचा 'Master' डान्स, पाहा VIDEO

भारतीय महिला टीमने (Team India Women) मालिकेत पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर भारतीय टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : भारतीय महिला टीमने (Team India Women) मालिकेत पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर भारतीय टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय खेळाडूंनी तामिळ सुपरस्टार विजय (Tamil Superstar Vijay) याच्या मास्टर (Master) सिनेमातील ‘वाथी कमिंग’ (Vaathi Coming) या टिझरवर जोरदार डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) आकांक्षा कोहली (Akanksha Kohli) व्हीआर वनिता (VR Vanitha) आणि ममता माबेन (Mamata Maben) या चार खेळाडूंनी हा डान्स केला आहे.  वेदा कृष्णमूर्तीने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मास्टर सिनेमातील ‘वाथी कमिंग’ हे टिझर भलतेच लोकप्रिय आहे. यापूर्वी अहमदाबादमध्ये जिममध्ये  व्यायाम करत असताना आर. अश्विन, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी देखील या टिझरवर नाच केला होता. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर भारतीय महिला टीमच्या खेळाडूंना देखील या गाण्यावर नाच करण्याचा मोह आवरला नाही.

संबंधित बातम्या

लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि पूनम राऊत (Poonam Raut) या दोघींनी अर्धशतकं केली, तर झूलन गोस्वामीने (Jhulan Goswami) 42 रन देऊन 4 विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 3 विकेट घेण्यात यश आलं. (हे वाचा- Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO ) भारतीय टीमच्या या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले, यात 3 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही 125 चा होता. तर पूनम राऊतने 89 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली.  मंधानाने लागोपाठ 10व्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या