मुंबई, 2 जून : टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत (Jaya Bharadwaj) बुधवारी लग्न केले. आग्रामधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या दोघांनी लग्न केले. या लग्नानंतर दीपकच्या सोशल मीडिया पोस्टची फॅन्सना प्रतीक्षा होती. त्यांची प्रतीक्षा काही तासांमध्येच संपली. दीपक आणि जया या दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून लग्नानंतर एकमेकांबद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. दीपकनं त्याच्या पोस्टमध्ये लिहलंय की, ‘मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू माझ्यासाठी बनली आहेस असं मला वाटलं. आपण प्रत्येक क्षण एकत्र घालवला आहे. मी तुला नेहमी आनंदी ठेवेन असं वचन देतो. ’ त्याचबरोबर ‘हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असून आम्हाला आशिर्वाद द्या,’ असंही दीपकनं या पोस्टमध्ये पुढे लिहलं आहे.
दीपक चहरची पत्नी झाल्यानंतर जया भारद्वाजनंही पोस्ट लिहली आहे. ‘त्यानं माझं हृदय चोरलं म्हणून मी त्याचं नाव चोरलं असं जयानं या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
आयपीएलच्या मागील सिझनमध्ये (IPL 2021) दीपक चहरने स्टॅण्डमध्ये जाऊन जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं. आयपीएल 2022 आधी दीपक चहरला दुखापत झाली, त्यामुळे तो आयपीएलही खेळू शकला नाही, तसंच दक्षिण आफ्रिका सीरिजसाठीही तो मैदानात उतरणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी चहर फिट होण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने चहरला 14 कोटी रूपयांना विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो मैदानात उतरू शकला नाही, याचा फटका सीएसकेला मोठ्या प्रमाणावर बसला. चार वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नईला यंदा प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नाही. मागच्या वर्षी सीएसकेला आयपीएल चॅम्पियन करण्यात दीपक चहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय कॅप्टन ते न्यूझीलंडचा ऑल राऊंडर, वर्ल्ड कप गाजवण्यासाठी अमेरिकेची Playing 11 सज्ज कोण आहे जया भारद्वाज? दिल्लीतल्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जया काम करते. प्रसिद्धीपासून फार लांब असल्यामुळे जयाबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरही ती फारशी ऍक्टिव्ह नसते. एमटीव्ही स्पिल्ट्स व्हिला सिझन 2 चा विजेता असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची ती लहान बहिण आहे.