JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : विराट कोहलीवर 'पुष्पा' ची जादू, पाहा कुणाकडं बघत म्हणाला, मै झुकेगा नही...

VIDEO : विराट कोहलीवर 'पुष्पा' ची जादू, पाहा कुणाकडं बघत म्हणाला, मै झुकेगा नही...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील अभिनेता अल्लू अर्जुनच्या फॅन लिस्टमध्ये दाखल झाला आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटनं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील अभिनेता अल्लू अर्जुनच्या फॅन लिस्टमध्ये दाखल झाला आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटनं पुष्पा स्टाईल  सेलिब्रेशन केलं. विराटच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीची मोहालीमध्ये 100 वी टेस्ट होती. विराटने या टेस्टमध्ये फिल्डिंग करताना प्रेक्षकांकडे बघत हे सेलिब्रेशन केले. विराट कोहलीपूर्वी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), डेव्हिड वॉर्नर (David Warner) या क्रिकेटपटूंनीही पुष्पाच्या फेमस स्टेपची कॉपी केली आहे. टीम इंडियानं मोहाली टेस्टमध्ये श्रीलंकेचा 1 इनिंग आणि 222 रननं पराभव केला. रविंद्र जडेजानं ऑल राऊंड खेळाच्या जोरावर ही टेस्ट गाजवली. जडेजानं नाबाद 175 रनची खेळी केली, तसंच 9 विकेट्स घेतल्या. विराट कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा मात्र लांबली आहे. विराट शंभराव्या टेस्टमध्ये शतक करेल या आशेनं फॅन्सनी मोठी गर्दी केली होती. पण, विराट पहिल्या इनिंगमध्ये 45 रन काढून आऊट झाला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियावर बॅटींग करण्याची वेळ आलीच नाही.

संबंधित बातम्या

विराट कोहलीला 100 व्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याचा सन्मान केला आणि खास टोपी दिली. या सोहळ्यासाठी विराटची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. लहानपणीच्या नायकाकडून 100 वी टेस्ट खेळण्याबद्दल टोपी मिळणं खूपच खास आहे, त्यासाठी बीसीसीआयचे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. IND vs SL : मोहालीचा ‘किंग’ जडेजाचं टीम इंडियानं केलं जंगी स्वागत, पाहा VIDEO 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या