मुंबई, 26 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजला आजपासून (रविवार) सुरूवात होत आहे. तीन मॅचच्या या टेस्ट सीरिजनंतर दोन्ही देश तितक्याच सामन्यांची वन-डे सीरिज देखील खेळणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड येत्या 2 दिवसांमध्ये होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सीरिजपासून वन-डे टीमचं पूर्णवेळ नेतृत्त्व करणार आहे. रोहितच्या या टीममध्ये कुणाचा समावेश असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) 4 वर्षांनंतर वन-डे टीममध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. अश्विनची वन-डे सीरिजसाठी निवड निश्चित असल्याचं वृत्त ‘क्रिकबझ’ ने दिले आहे. टी20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध झालेली टी20 सीरिज यामध्ये अश्विननं जोरदार कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर अश्विन वन-डे टीममध्येही पुनरागमन करणार आहे. त्याने 2017 साली शेवटची वन-डे मॅच खेळली होती. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या जोडीची ही पहिलीच वन-डे सीरिज असेल. या सीरिजपासून टीम इंडिया 2023 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपची तयारी सुरू करेल. टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य सध्या विजय हजारे ट्रॉफीतील सामने पाहण्यासाठी जयपूरमध्ये आहेत. या स्पर्धेची फायनल रविवारी होणार असून त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा केली जाईल. रोहित शर्माचे फिटनेस अपडेट दरम्यान दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाऊ शकलेला रोहित शर्मा आता बरा होत आहे. . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा फिट दिसत आहे. तो सध्या एनसीएमध्ये असून पहिली टेस्ट पास झाला आहे. रविवारी त्याची शेवटची टेस्ट होऊ शकते. सध्या आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करणार नाही, रविवारच्या टेस्टनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा होणार बाबा, नताशाकडे आहे Good News डावखुरे स्पिनर आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनाही दुखापत झालेली आहे. या दोघांच्या बॉलिंगबाबत घाई केली जाणार नाही, कारण ते अजूनही पूर्णपणे फिट नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.