JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी 'क्रिकेट दक्षिण आफ्रिके'चा मोठा निर्णय!

IND vs SA: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी 'क्रिकेट दक्षिण आफ्रिके'चा मोठा निर्णय!

टीम इंडिया (Team India) तीन टेस्ट आणि तेवढ्याच वन-डे मॅच खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. पण, , या दौऱ्यावरील ओमिक्रॉनचे (Omicron) संकट अद्याप संपलेले नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 डिसेंबर: टीम इंडिया (Team India) तीन टेस्ट आणि तेवढ्याच वन-डे मॅच खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेट टीमनं लगेच सराव देखील सुरू केलाय. पण, या दौऱ्यावरील ओमिक्रॉनचे (Omicron) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे क्रिकेट साऊथ आफ्रिकाने 4 दिवसीय स्थानिक स्पर्धेच्या उरलेल्या मॅच स्थगित केल्या आहेत. त्यानंतर 26 डिसेंबर पासून दोन्ही टीममध्ये (India vs South Africa) होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी देखील मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार 26 डिसेंबरला सुरू होणारी टेस्ट प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टेस्टसाठी सरकारने फक्त 2000 फॅन्सना मैदानात प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या टेस्ट मॅचसाठीची तिकीट विक्री अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. काही खास व्यक्तींचा ही मॅच पाहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी 16-19 डिसेंबरच्या (डिव्हिजन 2) आणि 19-22 डिसेंबरच्या (डिव्हिजन 1) च्या दरम्यान होणाऱ्या पाचव्या राऊंडच्या मॅच स्थगित करण्याचा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA)  घेण्यात आला आहे. हे सामने बायो-बबलमध्ये होणार नव्हते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या सामन्यांना स्थगित करण्यात आलं आहे, ते पुढच्या वर्षी होणार आहेत, असं बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले. IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये विराटच्या निशाण्यावर द्रविड! भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सेन्चुरियन, दुसरी टेस्ट 3-7 जानेवारीला जोहान्सबर्गमध्ये आणि तिसरी टेस्ट 11-15 जानेवारीला न्यूलंड्स केपटाऊनमध्ये होणार आहे. सेन्चुरियन आणि जोहान्सबर्गमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे क्रिकेट साऊथ आफ्रिका कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या