JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: पहिली टेस्ट सुरू होताच टीम इंडियाला धक्का, श्रीलंकेनं हिसकावला पहिला क्रमांक

IND vs NZ: पहिली टेस्ट सुरू होताच टीम इंडियाला धक्का, श्रीलंकेनं हिसकावला पहिला क्रमांक

टीम इंडिया (Team India) गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध पहिली टेस्ट खेळण्यासाठी (India vs New Zealand) मैदानात उतरली. ही टेस्ट सुरू झाल्यानंतर काही तासांमध्येच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर: टीम इंडिया (Team India) गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध पहिली टेस्ट खेळण्यासाठी (India vs New Zealand) मैदानात उतरली. ही टेस्ट सुरू झाल्यानंतर काही तासांमध्येच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. हा धक्का न्यूझीलंडनं कानपूरच्या मैदानात दिला नाही. तर श्रीलंकेनं (Sri Lanka) त्यांच्या देशातील गॉलच्या मैदानात दिला आहे. श्रीलंकेनं गॉलमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा (Sri Lanka vs West Indies) 187 रननं पराभव केला. वेस्ट इंडिजला ही टेस्ट जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये 348 रनचं टार्गेट होतं. त्यांची संपूर्ण टीम 160 रन काढून ऑल आऊट झाली. त्यामुळे श्रीलंकेची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपम (World Test Championship) स्पर्धेत टीम इंडियाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. अर्थात अजूनही टीम इंडियाचे एकूण पॉईंट्स जास्त आहेत. श्रीलंकेनं वेस्ट इंडिजला हरवून 12 पॉईंट्सची कमाई केली. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ही श्रीलंकेची पहिलीच टेस्ट होती. त्यामुळे त्यांची सरासरी आता 100 टक्के आहे. आयसीसीच्या नियमानुसार एकूण टक्केवारीच्या आधारावरच टॉप टीमचा निर्णय होणार आहे. टीम इंडियााचे सध्या 26 पॉईंट्स आहेत. प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर  12 तर ड्रॉ झाल्यानंतर 4 पॉईंट्स मिळतात. टीम इंडियानं कानपूर टेस्टपूर्वी 4 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 2 मध्ये विजय मिळवला असून एक टेस्ट हरली आहे तर एक ड्रॉ झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे एकूण 28 पॉईंट्स व्हायला हवेत. पण इंग्लंड विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे टीमचे 2 पॉईंट्स कमी झाले आहेत.  4 मॅचनंतर सरासरीचा विचार केला तर टीम इंडियाकडं सध्या 54 टक्के पॉईंट्स आहेत.

संबंधित बातम्या

पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्ताननं या चॅम्पियनशिप स्पर्धेत 2 टेस्ट खेळल्या आहेत. त्यापैकी एक जिंकली असून एका टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांचे 12 पॉईंट्स असून सरारी 50 टक्के आहे. पाकिस्तानची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजची टीम 33.33 पॉईंट्ससह चौथ्या तर इंग्लंडची टीम 29.17 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. अन्य चार टीमनं अद्यापही एकही टेस्ट खेळलेली नाही. IND vs NZ: गावसकरांनी दिली कॅप, द्रविडमुळे मिळाली संधी, मुंबईकर श्रेयसची पदार्पणातच बाजी न्यूझीलंडची ही पहिलीच टेस्ट आहे. बांगलादेश 26 नोव्हेंबरपासून पाकिस्तान विरुद्ध पहिली टेस्ट खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पुढील महिन्यात  या स्पर्धेला सुरूवात करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या