JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा अपयशी, आता त्यांना वाचवणे द्रविडसाठीही अशक्य

IND vs NZ: टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा अपयशी, आता त्यांना वाचवणे द्रविडसाठीही अशक्य

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची सुरूवात धक्कादायक झाली. टीम इंडियाचे 2 दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले.

जाहिरात

कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा अपयशी ठरले आहेत. (फोटो सौजन्य - @ICC)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 28 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची सुरूवात धक्कादायक झाली. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले. इंग्लंड दौऱ्यातही या दोघांनी रन काढण्यासाठी संघर्ष केला होता. कानपूर टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही त्यांना मोठा स्कोअर करण्यात अपयश आले होते. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही त्यांनी स्पशेल निराशा केली आहे. चौथ्या दिवशी सकाळी कायले जेमीसननं पुजाराला सर्वप्रथम आऊट केले. विकेट किपर ब्लंडेलनं पुजाराचा कॅच घेतला. मैदानातील अंपायरनं पुजाराला आऊट दिले नव्हते. या निर्णयाच्या विरोधात न्यूझीलंडलं DRS घेतले. त्यावेळी पुजारा आऊट असल्याचे स्पष्ट झाले.

चेतेश्वर पुजारा आऊट झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) तर फक्त 4 रन काढून आऊट झाला. एजाज पटेललं त्याला आऊट केले.

चेतेश्वर पुजारा नंबर 3, विराट कोहली नंबर 4 आणि अजिंक्य रहाणे नंबर  5 अशी टीम इंडियाची टेस्टमधील बॅटींग ऑर्डर बऱ्याच वर्षांपासून आहे. कानपूर टेस्टमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळाली. श्रेयसनं पहिल्या इनिंगमध्ये 105 रनची खेळी करत ही निवड सार्थ ठरवली. आता मुंबई टेस्टमध्ये विराट टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे विराटसाठी अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा या दोन दिग्गजांपैकी एकाला टीम मॅनेजमेंटला वगळावे लागेल. या दोघांच्या खराब फॉर्ममुळे त्यांना आणखी वाचवणे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही जड जाणार आहे. दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी पोहचली Sunny leone, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या