मुंबई, 3 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 4 मार्च पासून होणाऱ्या टेस्टची सर्वांना उत्सुकता आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) ही 100 वी टेस्ट आहे. या कारणामुळे बीसीसीआयनं या मॅचसाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली आहे. विराट कोहलीच्या करिअरमधील मोठ्या मॅचमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सहभागी होणार की नाही? हा प्रश्न आता फॅन्स विचारत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील मतभेद उघड झाले होते. विराटनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टनसीबाबत गांगुलीनं केलेला दावा फेटाळला होता. त्यामुळे विराटच्या 100 व्या टेस्टमध्ये गांगुली सहभागी होणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला होता. या विषयावर एक अपडेट माहिती समोर आली आहे. सौरव गांगुली गेले काही दिवस सुट्टीसाठी लंडनला गेले होते. ते गुरुवारी चंदीगडमध्ये दाखल होणार आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. विराटच्या 100 व्या टेस्टमध्ये गांगुली सहभागी होणार, अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. विराटनं टी20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर त्याला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात आले होते. त्यावर बराच वाद झाला. दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर जानेवारी महिन्यात विराटनं टेस्ट कॅप्टनसीही सोडली. BCCI Central Contracts : हार्दिकसह पुजारा रहाणेला धक्का, बीसीसीआयने केलं डिमोशन विराट कोहलीनं टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नये, असं मत बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी व्यक्त केले होते. विराटनं मुंबईतील पत्रकार परिषदेत हा दावा फेटाळला होता. तसंच दक्षिण आफ्रिका विरूद्धची टीम निवडण्यापूर्वी आपल्याला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले, असा दावा विराटनं केला होता. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते.