JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 सीरिजमधून आऊट! 'या' खेळाडूला मिळाली संधी

IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 सीरिजमधून आऊट! 'या' खेळाडूला मिळाली संधी

टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. भारताचा ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमधून (India vs Sri Lanka T20 Series) आऊट झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. केएल राहुल (KL Rahul), दीपक चहर, (Deepak Chahar), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे प्रमुख खेळाडू सध्या दुखापतीमुळे बाहेर आहेत. या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव वाढलं आहे. भारताचा ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमधून (India vs Sri Lanka T20 Series) आऊट झाला आहे. ‘क्रिकबझ’ नं दिलेल्या वृत्तानुसार ऋतुराज दुसरी आणि तिसरी टी20 मॅच खेळणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. लखनऊमध्ये झालेल्या सीरिजमधील पहिल्या मॅचच्यापूर्वी ऋतुराजच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो संपूर्ण सीरिज खेळू शकणार नाही. मयंक अग्रवालचा टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये समाेश करण्यात आला आहे. तो टीममधील अन्य सदस्यांसोबत सध्या चंदीगडमध्ये तयारी करतोय. त्याला चंदीगडहून धर्मशालामध्ये पाठवण्यात आलं आहे. एका  बायो-बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये तो प्रवेश करतोय. त्यामुळे त्याला क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. IND vs SL : श्रीलंकेला डबल धक्का, T20 Series मधून दोन स्टार खेळाडू आऊट! लखनऊमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये भारतानं श्रीलंकेचा 62 रननं पराभव केला. या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 199 रन केले. इशान किशननं (Ishan Kishan) 56 बॉलमध्ये 89 रन काढले. तर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) अर्धशतक झळकावले. त्याला उत्तर देताना लखनऊची टीम 6 आऊट 137 रनच करू शकली. आता शनिवारचा सामना जिंकून ही सीरिज खिशात टाकण्याची संधी टीम इंडियाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या