केपटाऊन, 15 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट DRS च्या वादामुळे गाजली. या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गारला (Dean Elgar) DRS च्या वादग्रस्त निर्णयमामुळे जीवदान मिळाले होते. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाचे खेळाडू चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी स्टंप माईकवर नाराजी व्यक्त केली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर बोलताना विराटने या विषयावर स्पष्टीकरण दिले. ‘मला या विषयावर काहीही अधिक बोलायचे नाही. मैदानात काय झाले हे आम्हाला माहिती आहे. बाहेरच्या लोकांना मैदानात काय सुरू होते, ते माहिती नाही. आम्हाला मैदानात जे योग्य वाटले ते केले. आम्ही तो वाद विसरून पुढे गेलो आहोत. मला यावर आणखी जास्त बोलून नवा वाद नको आहे,’ असे विराटने सांगितले. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा मोठा विजय झाला, यानंतर यंदा भारतीय टीम इतिहास घडवेल, असं वाटत होतं, पण टीम इंडियाचं स्वप्न यावेळीही अधूरंच राहिलं. या पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपण कुठे कमी पडलो, याची कारणं सांगितली आहेत. ‘पहिल्या टेस्टमध्ये आम्ही चांगलं खेळलो, पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केलं आणि तिसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी तोच आत्मविश्वास पुढे नेला. महत्त्वाच्या क्षणी आमचं लक्ष विचलित झालं, त्याच महत्त्वाच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने चांगली कामगिरी केली, त्यामुळे ते विजयासाठी लायक होते,’ असं विराट म्हणाला. U19 World Cup: भारतीय बॉलरची कमाल, एकाच ओव्हरमध्ये केली दोन्ही हातांनी बॉलिंग! VIDEO ‘35-40 मिनिटांच्या खराब बॅटिंगमुळे आम्ही सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेने चांगली बॉलिंग केली, पण आम्ही सातत्य दाखवलं नाही. खूपवेळा आमची बॅटिंग गडगडली. आमच्यासाठी बॅटिंग हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. याबाबत आम्हाला नक्कीच विचार करावा लागणार आहे, अशी कबुली विराटने दिली.