JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : आऊट होताच राहुल झाला नाराज, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घातला वाद! VIDEO

IND vs SA : आऊट होताच राहुल झाला नाराज, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घातला वाद! VIDEO

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये वाद झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये वाद झाला. टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुसऱ्या इनिंगमध्ये आऊट झाल्यानंतर हा प्रकार घडला. मार्को जेन्सननं त्याला आठ रनवर आऊट केले. दुसऱ्या स्लिपमध्ये एडेन मार्करामनं त्याचा कॅच घेतला. हा अत्यंत जवळचा निर्णय होता. त्यानंतर राहुल आणि आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक उडली. ऑन फिल्ड अंपायरनं निर्णय जाहीर करेपर्यंत राहुलने मैदान सोडले नव्हते. राहुलच्या बॅटला लागलेला बॉल मार्करामच्या हातामध्ये असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट होताच तिसऱ्या अंपायरने यजमान टीमच्या बाजूने निर्णय दिला. आऊट झाल्यानंतर राहुल आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) यांच्यात वाद झाला. राहुल निराश अवस्थेत मैदान सोडत असताना हा प्रकार घडला.

संबंधित बातम्या

टीम इंडियाकडे महत्त्वाची आघाडी टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 85 रन केले आहेत. त्यामुळे टीमची आघाडी 58 रनची झाली आहे. आपलं करियर वाचवण्यासाठी खेळणारे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 रनवर खेळत आहेत. गेल्या काही काळापासून पुजारा आणि रहाणे यांना वारंवार अपयश येत आहे, त्यामुळे त्यांचं टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुसऱ्या दिवसाचा हिरो ठरला. शार्दुलने या इनिंगमध्ये 7 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला 2 आणि जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 27 रनची आघाडी मिळाली. वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडला बांगलादेशचा धक्का, पहिल्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता जोहान्सबर्ग टेस्टच्या तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट खेळ करून ही सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी टीम इंडियाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या