JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : DRS प्रकरणात भारतीय खेळाडूंवर कारवाई होणार का? ICC ने दिले उत्तर

IND vs SA : DRS प्रकरणात भारतीय खेळाडूंवर कारवाई होणार का? ICC ने दिले उत्तर

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) याला DRS च्या माध्यमातून नाबाद दिल्यानंतर भारतीय खेळाडू नाराज झाले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जानेवारी : टीम इंडियाला केपटाऊन टेस्ट आणि मालिका (India vs South Africa) जिंकण्यात अपयश आले आहे. तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टमधील शेवटचे दोन दिवस भारतीय टीमसाठी खराब गेले. टीमने मैदानातील कामगिरीनं निराशा केलाीच. त्याचबरोबर DRS च्या निर्णयावर प्रमुख खेळाडूंनी नाराजी व्यक्त करत नवा वाद ओढावून घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) याला DRS च्या माध्यमातून नाबाद दिल्यानंतर भारतीय खेळाडू  नाराज झाले होते. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांनी स्टम्प माईवरून या निर्णायावर नाराजी व्यक्त केली होती. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे हा आयसीसीच्या नियमानुसार गुन्हा आहे. त्यामुळे या खेळाडूंवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले होते. आयसीसीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या प्रकरणात सामना अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या वर्तनाबाबत टीम इंडियाच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर त्यांना खेळाडूंच्या वर्तनाबाबत सूचना केल आहे. या अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंवर आचारसंहितेचं भंग केल्याचा कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 2 अनोळखी खेळाडूंनी टीम इंडियाला दिली न विसरणारी जखम काय घडले होते प्रकरण? दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 21 व्या ओव्हरचा अश्विनने टाकलेला चौथा बॉल एल्गारच्या पॅडला लागला, यानंतर भारताने अपील केलं आणि अंपायर मरेस इरासमस यांनी एल्गारला आऊट दिलं. एल्गारने मात्र डीआरएस (DRS Controversy) घेण्याचा निर्णय घेतला. एल्गारने डीआरएस घेतल्यानंतर मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून फक्त टीम इंडियाच नाही तर अंपायरही धक्क्यात होते. पण विराट कोहलीने केलेलं वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. एकीकडे विराटने हे वक्तव्य केलेलं असतानाच अंपायर मरेस इरासमस यांनीही डोकं हलवलं आणि हे अशक्य आहे, असं वक्तव्य केलं. तर अश्विनने प्रसारण करणाऱ्या सुपरस्पोर्ट चॅनलवरच निशाणा साधला. जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट असं अश्विन स्टम्प माईकच्या जवळ येऊन म्हणाला. तर संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत आहे, असं वक्तव्य व्हाईस कॅप्टन केएल राहुलने केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या