JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : दर 4 टेस्टनंतर बुमराह करतोय कमाल, कपिल देव यांना टाकले मागे

IND vs SA : दर 4 टेस्टनंतर बुमराह करतोय कमाल, कपिल देव यांना टाकले मागे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) 5 विकेट्स घेतल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केपटाऊन, 13 जानेवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) 5 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या भेदक बॉलिंगमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 13 रनची आघाडी घेतली. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 223 रन केले होते. त्याला उत्तर देताना आफ्रिकेची पहिली इनिंग 210 रनवर संपुष्टात आली. बुमराहाच्या करिअरमधील ही 27 वी टेस्ट आहे. यापैकी 25 टेस्ट त्याने देशाच्या बाहेर खेळल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. याचाच अर्थ दर चार टेस्टमध्ये तो 5 विकेट्स घेत आहे. माजी कॅप्टन आणि महान ऑल राऊंडर कपिल देव (Kapil Dev) यांनी देशाच्या बाहेर 66 टेस्ट खेळल्या. यामध्ये त्यांनी 12 वेळा 5 विकेट्स घेतल्या. याचा अर्थ त्यांनी दर 6 टेस्टनंतर 5 विकेट्स घेतल्या. बुमराहचा रेकॉर्ड त्यांच्यापेक्षा सरस आहे. भारताच्या अन्य फास्ट बॉलर्समध्ये इशांत शर्माने (Ishant Sharma) 63 टेस्ट घराबाहेर खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 9 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तर झहीर खानने 54 टेस्टमध्ये 8, आणि इरफान पठाणने 15 टेस्टमध्ये 7 वेळा ही कामगिरी केली आहे. इराफानची होम ग्राऊंडपेक्षा विदेशातील कामगिरी अधिक सरस आहे. त्याने दोन टेस्टनंतर एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या

केपटाऊन टेस्टमधील एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणारा बुमराहा हा तिसरा बॉलर ठरला आहे. यापूर्वी हरभजन सिंग (120 रन 7 विकेट्स), श्रीशांत (114 रन 5 विकेट्स) यांनी ही कामगिरी केली होती. बुमराहने 42 रनमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची बुमराहची दक्षिण आफ्रिकेतील दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 वेळा तर ऑस्ट्रेलियात एक वेळा ही कामगिरी केली आहे. IND vs SA 3rd Test : भारताला लागोपाठ दोन धक्के, विराट-पुजारा ठरवणार मॅचचा निकाल! तीन टेस्टच्या या सीरिजमधील सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं, यानंतर सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता केपटाऊनची टेस्ट निर्णायक ठरणार आहे. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या