मुंबई, 21 फेब्रुवारी : देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या पाच मॅचच्या टी-20 मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमारनं गेल्या तीन आयपीएल सिझनमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले आहेत. आयपीएल 2020 (IPL 2020) मधील कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होईल असं मानलं जात होतं. मात्र तेव्हा त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यात आले होते. भारतीय टीममधून मनिष पांडेला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सूर्यकुमार अंतिम 11 मध्ये खेळेल असं मानलं जात आहे. टीम इंडियात निवड होताच सूर्यकुमारनं तयारी सुरु केली आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील लढतींसाठी मुंबईत आहे. या निवडीनंतर त्यानं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्या पिचवर बसलेला असून ‘स्वप्नात असल्यासारखं वाटत आहे,’ असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं आहे.
टीम इंडियातील जागेसाठी मोठी तपश्चर्या सूर्यकुमारनं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोठी तपश्चर्या केली आहे. त्यानं 77 फर्स्ट क्लास मॅसेजमध्ये 44.01 च्या सरासरीनं 5326 रन केले आहेत. त्यामध्ये 14 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यानं 170 टी-20 मॅचमध्ये 140.10 च्या सरासरीनं 3567 रन केले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या तेराव्या सिझनमध्ये (IPL 2020) त्यानं 16 व्या मॅचमध्ये 40 च्या सरारसरानं 480 रन केले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 145.02 होता. ( वाचा : IND vs ENG : टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्या-टेविटियाचं पदार्पण ) भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल टेवटिया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर