मुंबई, 15 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंड विरूद्ध गुरूवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये (IND vs ENG) विराट फक्त 16 रन काढून आऊट झाला. इंग्लंडनं या सामन्यात 100 रननं विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता शेवटची लढत 17 जुलै (रविवार) रोजी होणार आहे. बाबरची मध्यरात्री धाव टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) विराटचा बचाव केला आहे. त्यानं मध्यरात्री सोशल मीडियावर विराटला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली आहे. ‘ही वेळ देखील जाईल. भक्कम राहा’, असं बाबरनं म्हंटलं. पाकिस्तानची टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या दरम्यान बाबरनं केलेल्या या वक्तव्याबाबत त्याची अनेकांकडून प्रशंसा होत आहे.
इंग्लंडमधील सध्याच्या सीरिजमध्ये विराट कोहलीनं 5 इनिंगमध्ये बॅटींग केली. त्यापैकी एकाही इनिंगमध्ये त्यानं 20 पेक्षा जास्त रन केले नाहीत. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून आता अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. त्यामुळे कपिल देवसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटला वगळून एखाद्या तरूण खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. Live मॅचदरम्यान मोठा अपघात; प्रतिस्पर्ध्याच्या पंचमुळे रिंगमध्ये कोसळला 23 वर्षीय बॉक्सर, मृत्यू विराट दुखापतीमुळे पहिली वन-डे खेळू शकला नव्हता. तो दुसऱ्या मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 16 रन काढून डेव्हिड विलीच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानं 3 फोर लगावत चांगली सुरूवात केली होती. पण, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर तो आऊट झाला.